अशी झाली मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकरच्या आईची पहिली भेट

एका मुलाखतीत सिद्धार्थने हा मजेदार किस्सा सांगताना म्हणाला….

mitali
(Photo-Instagram/ Siddharth chandekar)

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध एक जोडी म्हणजे अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर. हे दोघेही उत्तम कलाकार आहेत. सिद्धार्थ आणि मिताली सोशल मीडियावर देखील चांगलेच सक्रिय आहेत. २४ जानेवारी २०२१ रोजी हे दोघेही विवाह बंधनात अडकले. सिद्धार्थ आणि मितालीच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत होते. त्यांच्या या लग्नसोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. मात्र तुम्हाला माहिती आहे का की मिताली आणि सिद्धार्थ चांदेकर या दोघांच्याही आईची भेट कशी झाली?

सिद्धार्थ चांदेकरचे त्याच्या आईशी खूप जवळचे आणि एखाद्या मित्र-मैत्रिणीसारखं नाते आहे. एका मुलाखतीत त्याने त्याच्या आईला मितालीबद्दल कधी आणि कसं सांगितलं याबाबत खुलासा केला. तसंच मिताली पहिल्या भेटी कधी आणि  कशी होती? असा प्रश्न विचारण्यात आला होता. या भेटीबद्दल एक मजेदार किस्सा सांगताना तो म्हणाला, “मी आईला मितालीचा फोटो व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवला. पुढे तिने मला मेसेज करत ही कोण आहे..? असं विचारलं. त्यावर मी म्हणालो ही मुलगी कशी आहे? तर त्यावर तिने फक्त “हा..” इतकाच आसा रिलाय दिला बास आमच्यात त्यावेळी इतकंच बोलणं झालं.”

पुढे सिध्दार्थ त्याची आई आणि मितालीची पहिली भेट कशी झाली? याबद्दल बोलताना म्हणाला की, “माझी आई चहा प्रेमी आहे. त्यामुळे मी पहिले मितालीला चहा कसा बनवायचा ते शिकवलं आणि मग आईला घरी बोलावलं. मग काय आमचं काम सोप झालं.” मिताली आणि सिद्धार्थने दोन वर्षांपूर्वी व्हॅलेंटाइन्स डेच्या दिवशी प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर त्या दोघांनी साखरपूडा केला होता. लग्नाआधी ते दोघं लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहात होते. पुण्यातील ढेपेवाडा येथे २४ जानेवारी रोजी ते विवाहबंधनात अडकले. या विवाहसोहळ्याला प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर, पूजा सावंत, अभिज्ञा भावे, अभिनेता भूषण प्रधान यांच्यासह अनेक मोठ्या कलाकारांनी हजेरी लावली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Siddharth chandekar opens up about his wife mitali mayekars first meeting with his mother aad