घटस्फोटाच्या चर्चेत सिद्धार्थ जाधवने पत्नी तृप्तीसोबत शेअर केला फोटो

सिद्धार्थने शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

siddharth jadhav shares photo with wife trupti
सिद्धार्थने शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सिद्धार्थ जाधव हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. सिद्धार्थ आणि त्याची पत्नी तृप्ती यांची जोडी ही गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या घटस्फोटाच्या बातमीमुळे चर्चेत होते. पण ही अफवा असल्याचे सिद्धार्थने स्पष्ट केले. या सगळ्यात सिद्धार्थने त्याने सोशल मीडियावर त्याची लेक स्वराचा फोटो शेअर केल्याची पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

आणखी वाचा : वडील अभिषेकचा डान्स कसा वाटला? मनिष पॉलच्या प्रश्नावर आराध्याने दिले असे उत्तर

सिद्धार्थने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सिद्धार्थ त्याची लेक स्वराचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. पण सगळ्यांचे लक्ष हे फोटोमध्ये असलेल्या सिद्धार्थची पत्नी तृप्तीने वेधले आहे. घटस्फोटाच्या चर्चेत सिद्धार्थने हा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत स्वराच्या वाढदिवसाला तुम्ही दिलेल्या शुभेच्छांबद्दल मनापासून आभार, लव्ह यू ऑल असे कॅप्शन दिले आहे.

आणखी वाचा : “हॉस्पिटलमध्ये एकनाथ शिंदेंचा फोन आला, म्हणाले…”, शरद पोंक्षेंची पोस्ट चर्चेत

पाहा फोटो :

आणखी वाचा : “साहेब, तुमच्या यादीत महाराष्ट्र हित चौथ्या क्रमांकावर…”; सुमीत राघवनने एकनाथ शिंदेंच्या ट्वीटवर दिली प्रतिक्रिया

सिद्धार्थनं अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आपल्या हटके स्टाईल आणि डान्ससाठी सिद्धार्थ ओळखला जातो. सिद्धार्थनं ‘डान्स महाराष्ट्र डान्स सीझन १’ या शोमध्ये परीक्षकाची भूमिका साकारली. लवकरच सिद्धार्थ ‘तमाशा लाईव्ह’ आणि ‘दे- धक्का 2’ या २ चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Siddharth jadav shares a photo with wife trupti on divorce news dcp

Next Story
VIDEO : अभिनेता-दिग्दर्शक म्हणून प्रवीण तरडे सुपरहिट, अन् वयाच्या ७९व्या वर्षी शेतामध्ये कष्ट करताहेत वडील
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी