scorecardresearch

“प्रेम अशा लोकांवर करा ज्यांना…”; घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान सिद्धार्थ जाधवने शेअर केलेली ‘ती’ पोस्ट व्हायरल

घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान अभिनेता सिद्धार्थ जाधवने शेअर केलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

siddharth jadhav siddharth jadhav photo
घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान अभिनेता सिद्धार्थ जाधवने शेअर केलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सिद्धार्थ जाधव त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. पत्नी तृप्तीपासून तो लवकर विभक्त होणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र या सगळ्या चर्चांबाबत सिद्धार्थ-तृप्तीने मौन पाळणंच पसंत केलं आहे. मुलगी स्वराचा वाढदिवस सिद्धार्थ-तृप्तीने एकत्र साजरा केला. त्याचदरम्यानचे फोटो सिद्धार्थने सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोंमध्ये तृप्ती देखील दिसत होती. आता सिद्धार्थने शेअर केलेली आणखी एक पोस्ट चर्चेत आली आहे.

आणखी वाचा – “खरंच वाईट वाटतंय कारण…”; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर हेमंत ढोमे झाला भावूक

स्वराच्या वाढदिवसानिमित्त सिद्धार्थने शेअर केलेल्या फोटोमध्ये तृप्ती दिसली. त्यानंतर दोघांमध्ये काहीच बिनसलं नसल्याच्या वेगळ्याच्या चर्चा सुरु झाल्या. पण या सगळ्या चर्चांमध्ये सिद्धार्थने शेअर केलेल्या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून सिद्धार्थने प्रेम कोणत्या व्यक्तीवर करावं याविषयी म्हटलं आहे.

सिद्धार्थ जाधवची पोस्ट चर्चेत
“आदर अशा लोकांचा करा जे तुमच्यासाठी त्यांच्या महत्त्वाच्या कामातून वेळ काढतात आणि प्रेम अशा लोकांवर करा ज्यांना तुमच्याशिवाय काहीही महत्त्वाचे वाटत नाही.” सिद्धार्थची ही इन्स्टाग्राम पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान सिद्धार्थने ही पोस्ट शेअर केल्याने पत्नी तृप्तीपासून खरंच हा वेगळा राहत आहे का? असा प्रश्न पुन्हा निर्माण होत आहे.

आणखी वाचा – VIDEO : “…त्याच्या अहंकाराचाही अंत होणं निश्चित”; उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर कंगना रणौतची प्रतिक्रिया

तृप्ती आणि सिद्धार्थ यांचं सोशल मीडिया अकाऊंट पाहिलं असता तर गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी एकमेकांसाठी एकही पोस्ट केलेली नाही. तसेच कोणतेही कार्यक्रम किंवा पार्ट्यांमध्येही ते दोघं एकत्र दिसले नाहीत. इतकंच नव्हे तर सोशल मीडियावर दोघांनीही एकमेकांना अनफॉलो केलं आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नात्याबद्दल विविध अफवा पसरवल्या जात आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Siddharth jadhav and his wife trupti divorce rumours actor share post on instagram viral on social media kmd

ताज्या बातम्या