scorecardresearch

Premium

अभिनेता सिद्धार्थ पुन्हा नव्या वादात; सायना नेहवालला मोदींच्या ट्वीटवरून नको त्या भाषेत रिप्लाय केल्याचा होतोय आरोप

सिद्धार्थला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. त्यानंतर त्याने स्पष्टीकरण ही दिले आहे.

siddharth, saina nehwal, pm modi,
सिद्धार्थला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. त्यानंतर त्याने स्पष्टीकरण ही दिले आहे.

‘रंग दे बसंती’ चित्रपटातून दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थ हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. दरम्यान, आता सिद्धार्थने बॅडमिंटनपटू सायना नेहवालवर एक आक्षेपार्ह कमेंट केली आहे. यामुळे सिद्धार्थ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला असून सोशल मीडियावर त्याला ट्रोल करण्यात आले आहे.

खरतरं सायनाने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत सायनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत झालेल्या चुकी विषयी सांगितले आहे. “कोणता ही देश सुरक्षित आहे असा दाव करू शकत नाही जर त्यांच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेत तडजोड होत असेल. पंतप्रधान मोदींवर अराजक तत्वांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करते”, असे सायना म्हणाली होती. सायनाच्या या ट्वीटवर उत्तर देत सिद्धार्थने एक ट्वीट करत सायनावर निशाना साधला आहे. सिद्धार्थ म्हणाला, “S****e c**k जागतिक विजेती नशिब आपल्याकडे भारताचे संरक्षण करणारे आहेत. #Rihanna तुला लाज वाटली पाहिजे.”

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…
asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने कोणते कपडे घालावेत, हे ठरवणारे तुम्ही कोण?

सिद्धार्थचे ट्वीट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले आहे. एक नेटकरी त्याला ट्रोल करत म्हणाला, “तिला त्रास देणे थांबव! तू चुकीची भाषा वापरत आहेस!” दुसरा नेटकरी म्हणाला, “हे खूप वाईट आहे. तुला काय वाटतं ते सगळ्यांसमोर मांड पण शब्द जरा जपून वापर”, अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले आहे.

आणखी वाचा : सुकेशसोबतचा इंटिमेट फोटो व्हायरल झाल्यानंतर जॅकलीचा पोल डान्सचा व्हिडीओ व्हायरल

आणखी वाचा : Bigg Boss 15 : ‘तुला चप्पलने मारेन’, नेहा भसीनची धमकी ऐकताच बिचुकलेचा चढला पारा म्हणाला…

ट्रोल झाल्यानंतर सिद्धार्थने स्पष्टीकरण दिले आहे. कोंबडा आणि बैल, या संदर्भाने मी वक्तव्य केलंय. वेगळा अर्थ लावणे अयोग्य ठरेल. कोणाचाही अपमान करण्याचा माझा उद्देश नव्हता, याची नोंद घ्यावी, असे सिद्धार्थ म्हणाला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Siddharth sexist remark on badminton player saina nehwal netizens trolled him dcp

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×