बिग बॉस विजेता आणि अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला. सिद्धार्थ शुक्लाच्या मृतदेहाच्या पोस्टमॉर्टमची प्रक्रिया झाली असून उद्या सकाळी अहवाल सादर करण्यात येणार आहे. अवघ्या चाळीस वर्षीय सिद्धार्थ शुक्लाचा मृत्यू ह्रदयविकाराच्या झटक्याने झाला असं सांगण्यात येतंय. मात्र यावर आता सिद्धार्थच्या जिम ट्रेनर एक मोठा खुसाला केलाय. त्यामूळे सिद्धार्थ शुक्लाच्या मत्यूला नवं वळण लागलं आहे.

सिद्धार्थ शुक्ला आता आपल्यात राहिला नाही, हे स्वीकारणं त्याच्या चाहत्यांना खूपच अवघड जात आहे. सिद्धार्थच्या मृत्यूनंतर फॅन्सना पुन्हा एकदा सुशांतच्या मृत्यूची आठवण झाली. काहींनी तर सिद्धार्थच्या मृत्यूबाबत शंका देखील व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर नेटकरी मंडळी सिद्धार्थच्या मृत्यूचे धागेदोरे सुशांतच्या मृत्यूशी जोडत असतानाचा आता सिद्धार्थच्या जिम ट्रेनरने एका माध्यमाशी बोलताना मोठा खुलासा केलाय. “सिद्धार्थचा मृत्यू हार्ट अटॅकने होऊच शकत नाही”, असं मोठं वक्तव्य या जिम ट्रेनरने केलंय. सोनू चौरसिया हा सिद्धार्थचा जिम ट्रेनर आहे. गेल्या दीड वर्षापासून सोन चौरसिया हा सिद्धार्थला जिममध्ये फिटनेसची ट्रेनिंग देत होता. जिम ट्रेनर सोनू चौरसियाच्या या वक्तव्यामुळे सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.

आणखी वाचा : Sidharth Shukla Last Call: मृत्यूपूर्वी सिद्धार्थचा ‘या’ अभिनेत्याला शेवटचा कॉल…

एका माध्यमाशी बोलताना जिम ट्रेनन सोनू चौरसिया म्हणाला, “दररोज १०.३० वाजता आम्ही दोघे जिममध्ये भेटत होतो. जिममध्ये सिद्धार्थ खूप हार्डवर्क करत असायचा. सकाळी ९.३० वाजता मला राहुल वैद्यचा फोन आला आणि सिद्धार्थची तब्येत बिघडल्याचं सांगितलं. सुरूवातीला मला विश्वासच बसला नाही. पण त्यानंतर मला भरपूर फोन येऊ लागले. सिद्धार्थच्या मृत्यूमुळे मला मोठा धक्का बसला. सिद्धार्थ कधीच कोणत्याही मानसिक ताणावाखाली किंवा डिप्रेशनमध्ये नव्हता. कायम आनंदी राहणारा आणि लोकांना आनंदी ठेवणारा व्यक्ती होता. २४ ऑगस्ट रोजी आम्हा दोघांचं बोलणं सुद्धा झालं होतं. त्याने मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या होत्या. २० ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहिणीला गाडी खरेदी केल्याचं त्याने सांगितलं होतं. २२ ऑगस्ट रोजी त्याने बहिणीला ही गाडी गिफ्ट केली. जिम मध्ये कायम तो आनंदीच होता आणि भरपूर मेहनत घेत होता.”

आणखी वाचा : ‘मरण आयुष्यातलं सर्वात मोठं नुकसान नसतं…; सिद्धार्थ शुक्लाचं हे भावूक ट्विट व्हायरल

यापुढे बोलताना सोनू चौरसिया म्हणाला, “रात्रीच्या जेवणानंतर तो ४० मिनीट वॉक सुद्धा करत होता. काल रात्री ११.३० वाजता एका मिटींगहून तो घरी परतला. मिटींगमध्ये तो जेवून आला होता. यासाठी त्याने घरी येऊन फक्त फळे आणि ताक प्यायला होता. त्यानंतर रात्री १.३० वाजता तो झोपण्यासाठी गेला. सकाळी जेव्हा त्याची आई त्याला उठवण्यासाठी गेली त्यावेळी तो सरळ पद्धतीने झोपला होता. सिद्धार्थ अशा पद्धतीने कधीच झोपत नव्हता.

आणखी वाचा : Siddharth Shukla Death: ‘बालिका वधु’मधील जोडीची कायमची एक्झिट; आनंदीची आत्महत्या तर ‘शिव’ला हार्टअटॅक

त्यानंतर ताबडतोब डॉक्टरांना बोलावलं. पंप वैगेरे केलं, पण त्याची काही हालचाली होत नव्हती. त्याची तब्येत जास्त गंभीर असल्याचं सांगत डॉक्टरांनी त्याला रूग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. पण रूग्णलायत नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. मी सुद्धा पोस्टमॉटर्म रिपोर्टचीच प्रतिक्षा करतोय. कारण त्याचा मृत्यू हार्ट अटॅकने झालाय, यावर मला विश्वासच बसत नाही.”