विकी-कतरिना पाठोपाठ सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाची चर्चा, सिद्धार्थ मल्होत्रा म्हणतो….

सिद्धार्थने लग्नाबद्दल दिलेल्या या खुलासामुळे आता त्याच्या चाहत्यांमध्ये कियारासोबतच्या नात्याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. विविध चित्रपटासह त्याच्या खासगी जीवनामुळेही त्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. सिद्धार्थ आणि अभिनेत्री कियारा आडवाणी रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. सिद्धार्थ आणि कियारा अनेकदा एकत्र दिसतात. हे दोघेही नुकतंच ‘शेरशाह’या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटाच्या यशानंतर आता तो विविध चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. मात्र या सर्व गोष्टींमध्ये तो लवकरच कियारासोबत विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. नुकतंच त्यानेही याबाबत एका मुलाखतीत माहिती दिली आहे.

‘शेरशाह’ या चित्रपटानंतर सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी एकमेकांना डेट करत असल्याचे बोललं जात आहे. अनेकदा ते दोघं एकत्र पाहायला मिळतात. त्यामुळे त्यांच्या लग्नाच्या जोरदार चर्चा सुरु आहे. हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, एका मुलाखतीत सिद्धार्थला त्याच्या लग्नाबद्दल विचारण्यात आले, तेव्हा तो हसत हसत म्हणाला, “मी माझ्या लग्नाबद्दल अजून कोणताही प्लॅन बनवलेला नाही. हे एक ना एक दिवस नक्की होईल. पण अजून तरी तो चित्रपट तयार झालेला नाही. माझ्याकडे त्याची कथा, स्क्रिप्ट किंवा कलाकार यापैकी एकही गोष्ट अद्याप तयार नाही. जेव्हा कधी या गोष्टी होतील, तेव्हा मी नक्की याबाबत सर्वांना सांगेन,” असे त्याने सांगितले. सिद्धार्थने लग्नाबद्दल दिलेल्या या खुलासामुळे आता त्याच्या चाहत्यांमध्ये कियारासोबतच्या नात्याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये लगीनघाई पाहायला मिळत आहे. अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ हे दोघेही येत्या डिसेंबरमध्ये लग्न करणार असल्याचे बोललं जात आहे. तर दुसरीकडे रणवीर कपूर आणि आलिया हे दोघेही विवाहबंधनात अडकणार असल्याचे समोर आलं आहे. त्यानंतर आता सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे.

कियारा आडवाणीसोबत सिद्धार्थ मल्होत्रा लवकरच करणार लग्न? अभिनेत्याने सांगितला प्लॅन

दरम्यान सिद्धार्थला ‘शेरशाह’ चित्रपटाबद्दल विचारले असता तो म्हणाला की, “यशामुळे कलाकाराची भावना बदलत जाते. मी एक कलाकार म्हणून कामावर परतलो आहे आणि मला खात्री आहे की जेव्हा मी याबद्दल कोणतेही सूचना देईन, तेव्हा त्याला अधिक महत्त्व दिले जाईल,” असेही त्याने सांगितले.

“कदाचित तीन वर्षांपूर्वी मी याबद्दल कोणत्याही सूचना दिल्या असत्या तर त्यावर हे करावे की करु नये असा विचार त्यांनी केला असता. मात्र आता मी एका अशा चित्रपटात काम केले आहे ज्यामुळे प्रेक्षक सतत जोडलेले राहतात. त्यामुळे मी याकडे सकारात्मक बदल म्हणून पाहतो. मला यात नक्की बदल घडवून आणायचा आहे. मी असे म्हणत नाही की मला या सर्व गोष्टी चांगल्या माहिती आहेत किंवा त्यावर नियंत्रण ठेवण्याचा मी प्रयत्न करत आहे, असे अजिबात नाही. मी फक्त त्या गोष्टींबद्दल एखादा सकारात्मक प्रयत्न करण्याबद्दल बोलत आहे. तो प्रयत्न करण्यात काहीही नुकसान नाही,” असेही तो म्हणाला.

‘आलियाला चित्रीकरण करताना किस करणं…’, सिद्धार्थ मल्होत्राचा धक्कादायक खुलासा

दरम्यान, ‘शेरशाह’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटामध्ये सिद्धार्थने कारगिल युद्धात शहिद झालेल्या कॅप्टन विक्रम बत्राची भूमिका साकारली होती. तर कियाराने विक्रम बत्रा यांची गर्लफ्रेंड डिंपल चीमाची भूमिका साकारली होती. यानंतर आता लवकरच तो ‘मिशन मजनू’ या चित्रपटात दिसणार आहे. यात सिद्धार्थ मल्होत्रासोबत दाक्षिणात्य स्टार आणि नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी रश्मिका मंदना बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या दोघांची जोडी पहिल्यांदाच झळकणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sidharth malhotra finally breaks silence on his wedding plans with kiara advani nrp

Next Story
चित्रगीत : सॅक्रेड चॅण्टस ऑफ शक्ती
ताज्या बातम्या