शेहनाजसोबत डिसेंबरमध्ये लग्न करणार होता सिद्धार्थ शुक्ला; साखरपुडाही झाला होता

सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाच्या दोन दिवसानंतर शेहनाज गिलसोबतच्या नात्याबाबत नवी अपडेट समोर आलीय. या दोघांचा साखरपुडा झाला असून येत्या डिसेंबरमध्ये लग्न करणार होते.

sidharth-Shukla-shehnaaz-gill-planning-married-in-december

सिद्धार्थ शुक्ला याने 2 सप्टेंबर रोजी जगाला निरोप दिला. त्याच्या मृत्यूमुळे चाहते आणि त्याचे सहकारी कलाकार खूपच अस्वस्थ झाले असून त्यांना मोठा धक्का बसला आहे. सिद्धार्थ केवळ ४० वर्षांचा होता आणि आयुष्यात नवीन उंची गाठत होता. सिद्धार्थाच्या मृतदेहावर ओशिवरा स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. त्याचा अखेरचं पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक बाहेर जमले होते. यावेळी शेहनाज गिल देखील उपस्थित होती. सिद्धार्थच्या मृत्यूमुळे शेहनाज बरीच असहाय झालेली दिसून आली. तिचे बरेच फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात ती अतिशय वाईट स्थितीत रडताना दिसली. सिद्धार्थच्या निधनाच्या दोन दिवसांनी दोघांच्या नात्याबाबत एक नवी अपडेट समोर आली आहे. सिद्धार्थ शुक्ला आणि शेहनाज गिल हे दोघेही येत्या डिसेंबरमध्ये लग्न करणार होते. शेहनाज गिलच्या जवळच्या एका मित्राकडून ही समोर आली आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ शुक्ला आणि शेहनाज गिल या दोघांचा साखरपुडा देखील झाला होता. नुकतंच हे दोघेही त्यांच्या लग्नाच्या तयारीला लागले होते. सिद्धार्थ शुक्ला आणि शेहनाज या दोघांनी त्यांच्या लग्नाबद्दल कुटुंबीयांना सांगितलं होतं. गेल्या अनेक दिवसांपासून ते दोघे लग्नाच्या तयारीत व्यस्त होते. रिपोर्टनुसार, दोघांचे कुटुंबीय देखील त्यांच्या लग्नाच्या तयारीमध्ये व्यस्त होते. मुंबईतील एका हॉटेलसोबतच रूम, बॅंक्वेट आणि इतर सेवांबाबतही त्यांची बातचीत सुरू होती. या दोघांच्या लग्नासाठी एकूण 3 दिवसांचे कार्यक्रम आयोजित करण्याचे प्लॅनिंग देखील सुरू होते.

आणखी वाचा: कपूर घराण्यातल्या ‘या’ सूनेचा मोठा खुलासा; बॉलिवूडमधून घेतला होता संन्यास

 

View this post on Instagram

 

A post shared by Sidharth Shukla (@realsidharthshukla)

सिद्धार्थ शुक्ला आणि शेहनाज गिलच्या कुटुंबीयांना तसंच त्यांच्या जवळच्या काही मित्रांना देखील लग्नाबद्दल माहिती होती. परंतु त्यांनी हे सिक्रेट ठेवलं होतं. घरात लग्नाची तयारी सुरू असतानाच अचानक २ सप्टेंबरची पहाट दोघांच्या कुटुंबीयांसाठी वाईट बातमी घेऊन सुरू झाली. सिद्धार्थचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आणि त्यासोबतच दोघांची सर्व स्वप्न अपूर्ण राहिली. सिद्धार्थ आणि शेहनाज दोघेही पवित्र बंधनात अडकण्यापूर्वीच काळानं घात केला. या दोघांच्या जोडीला तुटताना पाहून अनेक फॅन्सच्या डोळे देखील पाणावले होते. टीव्ही क्षेत्रातील हे क्यूट कपल पूर्णपणे वेगळे झाले.

आणखी वाचा: दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्या शेवटच्या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित; लेक रिद्धिमा झाली भावूक

 

View this post on Instagram

 

A post shared by SidNaaz (@its_sidnaaz_yashu)

आणखा वाचा : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफचा नीरज चोप्राला प्रश्न; म्हणाली….
सिद्धार्थ आणि शेहनाज हे दोघेही मुंबईतच राहत होते. शेहनाज कधी कधी सिद्धार्थच्या घरी जात असत. सिद्धार्थच्या कुटुंबीयांसोबत शेहनाजचे चांगले संबंध होते. या दोघांना अनेकद हॅंगआउऊट करताना देखील स्पॉट करण्यात आलं होतं. रिअल लाईफमधल्या या जोडीला फॅन्स आता फक्त रिलमध्येच एकत्र पाहू शकणार आहेत. रिअलमध्ये आता हे दोघे कधीच एकत्र येऊ शकणार नाहीत. या दोघांच्या सुंदर नात्याचा असा शेवट होईल, असा विचार देखील कुणी केला नव्हता.

आता शेहनाज आणि सिद्धार्थबाबत या माहितीमध्ये किती सत्यता आहे, हे येणारा काळच सांगेल. सिद्धार्थच्या अखेरच्या निरोपवेळी शेहनाजची प्रकृती अजिबात चांगली नव्हती. ती खूप तुटून गेलेली दिसत होती. तिचे आणि सिद्धार्थच्या आईचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sidharth shukla and shehnaaz gill planning married in december prp

ताज्या बातम्या