बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका अलका याज्ञिका यांनी रचला नवा विक्रम; टेलर स्विफ्ट, BTS बँडला टाकले मागे spg 93 | singer alka yagnik becomes worlds most streamed artist on youtube beats taylor swift bts | Loksatta

बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका अलका याग्निक यांनी रचला नवा विक्रम; टेलर स्विफ्ट, BTS बँडला टाकले मागे

अलका याज्ञिका यांनी नव्व्दच्या दशकात आपल्या करियरला सुरवात केली आहे

alka singer
फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस

नव्व्दच्या दशकात जसे अनके अभिनेते अभिनेत्री उदयास आले तसेच गीतकार संगीतकार आणि गायक, गायिका सुद्धा नावारूपास आले. यातीलच एक नाव म्हणजे अलका याग्निक, त्यांनी आजवर अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. आपल्या गोड आवाजाने त्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले होते. आजही त्यांची गाणी प्रेक्षक विसरले नाहीत. त्यांनी गाणी आवर्जून ऐकली जातात. अशातच त्यांनी एक नवा विक्रम केला आहे.

अलका याग्निक यांनी सलग तिसऱ्या वर्षी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे प्रसिद्ध गायक टेलर स्विफ्ट, ड्रेक आणि बेयॉन्से यांसारख्या गायकांना त्यांनी मागे टाकले आहे. २०२२ वर्षात ज्या गायकाची गाणी सर्वात जास्त ऐकली गेली आहेत त्यात नंबर १ ला अलका याज्ञिका आहेत. अलका नंतर बॅड बन्नी १४.७ अब्ज स्ट्रीम्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

बॉक्स ऑफिसवर ‘पठाण’चा दबदबा; ‘शेहजादा’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रदर्शनाच्याबाबतीत घेतला मोठा निर्णय

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार, अलका याग्निकच्या गाण्यांमध्ये १५.३ अब्ज ब्ज स्ट्रीम रेकॉर्ड झाले आहेत, म्हणजे दररोज सरासरी ४२ दशलक्ष स्ट्रीम. विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षांत त्यांनी हे यशही मिळवले आहे. त्यांचे अत्यंत प्रसिद्ध गाणे ‘एक दिन आप यूं हम को मिल जाएंगे’ हे २०२१ आणि २०२० मध्ये यूट्यूबवर १६.६ वेळा स्ट्रीम केले गेले. अलका यांच्याबरोबरीने भारतीय गायक उदित नारायण, अरिजित सिंह आणि कुमार सानू यांचाही यादी समावेश आहे.

अलका याग्निक यांनी नव्व्दच्या दशकात आपल्या करियरला सुरवात केली आहे. गेली ४ दशकं त्या पार्श्वगायन करत आहेत. त्यांच्या करियरमध्ये त्यांनी तब्बल २० हजार गाणी गायली आहेत. अलका यांचा जन्म २० मार्च १९६६ रोजी कोलकाता येथील गुजराती कुटुंबात झाला. त्यांची आई शोभा याग्निक या गायिका होत्या. वयाच्या ६ व्या वर्षी त्यांनी कोलकाता रेडिओसाठी गायला सुरुवात केली.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 20:02 IST
Next Story
“तो माझ्या चेहऱ्यावर आणि गुप्तांगावर…” ‘गंदी बात’फेम अभिनेत्री फ्लोरा सैनीची ‘ती’ पोस्ट चर्चेत