मुंबई : आपल्या अलवार आवाजाने हिंदी चित्रपट संगीतात पार्श्र्वगायक म्हणून अमीट ठसा उमटवणारे प्रसिद्ध गायक भूपेंद्र सिंह यांचे सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास क्रिटी केअर रुग्णालयात निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते.

गेली काही वर्षे ते चित्रपट संगीतापासून दूर होते. हिंदी चित्रपट संगीत क्षेत्रात तीन दशकांची कारकिर्द गाजविणारे भूपेंद्र सिंह प्रसिद्धीच्या झगमगाटापासून थोडे अंतर राखून होते, मात्र त्यांच्या नावाचा उल्लेख झाला तरी गझल गायकीशी जवळीक सांगणाऱ्या त्यांच्या आवाजातील लोकप्रिय गाणी रसिकांच्या ओठांवर सहज रुळू लागतात.

uddhav thackeray slams narendra modi during in an interview with the indian express
मोफत धान्य देण्यापेक्षा रोजगार का देत नाही? ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांचा मोदींना सवाल
kannada producer Soundarya Jagadish found dead
घरात मृतावस्थेत आढळले प्रसिद्ध चित्रपट निर्माते, काही दिवसांपूर्वी त्यांच्या पबविरोधात दाखल झाला होता गुन्हा
Prime Minister Modi criticism of Rahul gandhi Lalu Prasad Yadav regarding meat
श्रावण महिन्यात मटणावर ताव; पंतप्रधान मोदी यांची राहुल-लालूप्रसाद यांच्यावर टीका
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?

गेले काही दिवस त्यांच्या प्रकृतीतील गुंतागुंत वाढली होती. दहा दिवसांपूर्वी त्यांना क्रिटी केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना कर्करोग झाला असल्याचे प्राथमिक निदान डॉक्टरांनी केले होते. त्यानुसार तपासणी सुरू होती, मात्र ५-६ दिवसांपूर्वी त्यांना करोनाची लागण झाली. त्यामुळे त्यांच्या कर्करोग तपासणीतील अडचणी वाढत गेल्याचे क्रिटी केअर रुग्णालयाचे डॉक्टर दीपक नामजोशी यांनी सांगितले. रुग्णालयातच उपचारादरम्यान भूपेंद्र सिंह यांनी अखेरचा श्वास घेतला. किसी नजर को तेरा इंतजार आज भी है, दिल धुंडता है, नाम गुम जायेगा, एक अकेला इस शहर मे, जिंदगी मेरे घर आना ते अगदी अलिकडे सत्या चित्रपटातील बादलों को काट काट कर या गाण्यापर्यंत खास त्यांच्या आवाजातील गाणी अजूनही लोकांच्या मनात घर करून आहेत.