scorecardresearch

“देवाचं माझ्यावर…” प्रसिद्ध गायक जुबिन नौटियालने रुग्णालयातून शेअर केली पोस्ट

डोक्याबरोबर त्याच्या बरगड्यांनाही जबर मार लागला होता

“देवाचं माझ्यावर…” प्रसिद्ध गायक जुबिन नौटियालने रुग्णालयातून शेअर केली पोस्ट
फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

लोकप्रिय गायक जुबिन नौटियालच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. नुकतीच त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. रुग्णालयातला फोटो त्याने शेअर केला आहे. या फोटोवर अनेक कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. त्याची प्रकृती ठीक होत असल्याने अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

जुबिन नौटियाल मारतीच्या जिन्यांवरून पडल्याने त्याच्या कोपराला आणि आणि डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे. डोक्याची दुखापत किरकोळ असली तरी याबरोबरच त्याच्या बरगड्यांनाही जबर मार लागला होता. मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आता त्याने पोस्टमध्ये सांगितले आहे की त्याला डिस्चार्ग मिळाला आहे. तसेच त्याने देवाचे आभार मानले आहेत.

‘तू सामना आये’, ‘माणिके’, ‘बना शराबी’ आशा ट्रेंडिंग गाण्यांमुळे जुबिन चांगलाच चर्चेत आहे. जुबिनने ‘रातां लांबियां’, ‘लुट गए’, आणि ‘तुझे कितने चाहने लगे हम, तुम यासारख्या यासारखी कित्येक सुपरहीट गाणी दिली आहेत. आज त्याने या सुपरहीट गाण्यांच्या माध्यमातून भारतीय संगीत विश्वात स्वतःचं एक स्थान निर्माण केलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार गुरुवारी रात्री जुबिनच्या उजव्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांनी त्याला उजव्या हाताचा वापर न करण्याचा सल्ला दिला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 19:15 IST

संबंधित बातम्या