प्रसिद्ध पार्श्वगायक कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच ‘केके’चं मंगळवारी (३० मे) रात्री कोलकात्यामध्ये निधन झाले. कोलकात्यामध्ये लाइव्ह कॉन्सर्टदरमध्ये अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला, त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. अभी अभी.. तो मिले हो, अभी न करो छूटने की बात…, हम रहे या ना रहे कल…, यासारख्या गाण्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा आवाज काळाच्या पडद्याआड गेला आहे. काल रात्री १०.४५ मिनिटांनी त्याचे निधन झाले. वयाच्या ५३ व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. त्याच्या मृत्यूनंतर कोलकात्याच्या या लाइव्ह कॉन्सर्टमधील अनेक व्हिडीओ समोर येत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ३१ मे रोजी केके कॉन्सर्टवरुन परत आल्यानंतर ग्रॅण्ड हॉटेल येथे कोसळला. हे हॉटेल मार्केट पोलीस स्थानकाच्या हद्दीत येतं. केकेला तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. तिथे त्याला मृत घोषित केलं गेलं. त्याच्या या कॉन्सर्टमधील शेवटच्या लाइव्ह परफॉर्मन्सचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

“स्पॉटलाइट बंद करा, मला त्रास…” गायक ‘केके’ अखेरच्या क्षणी नेमकं काय म्हणाला होता?

एका नेटकऱ्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात तो अभी अभी.. तो मिले हो, अभी न करो छूटने की बात… हे गाणे गाताना दिसत आहे. हा व्हिडीओ १.१३ मिनिटांचा आहे. केके चा शेवटचा परफॉर्मन्स असे कॅप्शन दिले आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.

कसं झालं गायक ‘केके’चं निधन? वाचा कोलकाता कॉन्सर्टमध्ये नेमकं काय घडलं

केके कोलकात्यामधील गुरुदास कॉलेजमधील नाझरुल मंचच्या कार्यक्रमामध्ये गात असतानच त्याला अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे तो त्याच्या हॉटेल रुममध्ये परतला होता. तिथेच तो कोसळला आणि त्याला ततडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. त्याला कोलकात्यामधील सीएमआरआय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याला रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी त्याला ब्रॉट डेड म्हणजेच रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला, असं घोषित केलं. सध्या केकेच्या पार्थिवाचं शवविच्छेदन केलं जात आहे.