शाल्मलीने बॉयफ्रेंड फरहान शेखसोबत बांधली लग्नगाठ!

शाल्मलीचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

shalmali khogade, farhan shaikh,
शाल्मलीचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. (Photo Credit: PR handout)

बॉलिवूड गायिका शाल्मली खोलगडे ही लोकप्रिय गायिकांपैकी एक आहे. शाल्मलीने बॉयफ्रेन्ड फरहान शेखसोबत लग्न केलं आहे. शाल्मली आणि फरहान गेल्या ६ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. शाल्मली आणि फरहानने कुटुंबाच्या आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत लग्न केले.

या दोघांनी २२ नोव्हेंबर रोजी लग्न केले आहे. त्या दोघांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. सध्या त्यांच्या लग्नाचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. थोड्याच लग्नाच्या उपस्थितीत शाल्मली आणि फरहानने लग्न केल्यानंतर आता ते रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले आहे. १ डिसेंबर रोजी त्यांची रिसेप्शन पार्टी असल्याचे म्हटले जाते.

या दोघांनी आपल्या वरमालेत फुलांसोबत काही फोटो जोडले आहेत. फरहान मुंबईत मिक्सिंग आणि मास्टरींग इंजिनिअर म्हणून काम करतो. शाल्मली आणि फरहान यांनी अत्यंत गुप्त पद्धतीने लग्न केलं. तर शाल्मलीने परेशान, दारू देसी आणि बलम पिचकारी सारखी अनेक हिट गाणी गायली आहेत. तर शाल्मलीने ‘इंडियन आयडॉल ज्युनियर’ आणि ‘सूर नवा ध्यास नवा’ या म्युझिक रिऍलिटी शोमध्ये ‘इंडियन आयडॉल ज्युनियर’ आणि ‘सूर नवा ध्यास नवा’मध्ये परीक्षकाची जबाबदारी पार पाडली.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Singer shalmali kholgade marries boyfriend farhan shaikh simple ceremony dcp

Next Story
“ही माझी खुर्ची आहे”, परीचा नेहाला दम; धमाल व्हिडीओ पाहिलात का?
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी