सुरेश वाडकर यांचा हा नवीन लूक पाहून तुम्हीही व्हाल थक्क!

वाडकरांचा हा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

suresh wadkar

राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक सुरेश वाडकर त्यांच्या गायकीने नेहमीच श्रोत्यांना थक्क करतात. आता ते चर्चेत आले आहेत ते त्यांच्या गाण्यामुळे नाही तर त्यांच्या अनोख्या लूकमुळे. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात सुरेश वाडकरांचा नवा लूक पाहून अनेकांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

वाडकरांचा हा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ६३ वर्षीय सुरेश वाडकरांनी एका कार्यक्रमात सर्वांचंच लक्ष वेधलं. त्यांना पाहताच हे नक्की सुरेश वाडकर आहेत ना? असा प्रश्न अनेकांना पडल्यावाचून राहिला नसेल. यामागचे कारणही तसेच आहे. हा फोटो पाहता वाडकरांनी हेअर ट्रान्सप्लान्ट केल्याचं समजतंय.

suresh wadkar

या नव्या लूकमुळे त्यांच्यामध्ये बराच फरक जाणवतोय. त्यांचा हा नवा लूक खरंच लक्ष वेधणारा आहे यात शंका नाही. याआधी बॉलिवूडमध्ये सलमान खान, कपिल शर्मा, अक्षय खन्ना, अक्षय कुमार, हिमेश रेशमिया यांसह आतापर्यंत कितीतरी सेलिब्रिटींनी हेअर ट्रान्सप्लान्टचा पर्याय निवडलेला आहे.

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक गाण्यांना आवाज देत सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांनी एक वेगळीच ओळख निर्माण केली होती. ‘मेघा रे मेघा रे’, ‘चप्पा चप्पा चरखा चले’, ‘ए जिंदगी’ यांसारख्या अनेक सुपरहिट गाण्यांमुळे सुरेश वाडकरांनी चाहत्यांच्या मनावर त्यांच्या आवाजाची छाप सोडली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Singer suresh wadkar new look will amaze you

ताज्या बातम्या