scorecardresearch

संगीत श्रेत्रासाठी दु:खाची बातमी, वयाच्या ३३ व्या वर्षी ‘या’ लोकप्रिय गायकाचे निधन

या गायकाच्या पत्नीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याच्या निधनाती बातमी दिली होती.

tom parker, tom parker death,
या गायकाच्या पत्नीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याच्या निधनाती बातमी दिली होती.

ब्रिटीश-आयरिश बॉय बँड ‘द वॉन्टेड’चा सदस्य गायक टॉम पार्कर यांचे निधन झाले आहे. तो ३३ वर्षांचा होता. टॉमच्या मृत्यूचे कारण ब्रेन कॅन्सर असल्याचे सांगितले जात आहे. टॉमच्या मृत्यूची पुष्टी त्याची पत्नी केल्सी हार्डविकने सोशल मीडियापोस्ट द्वारे माहिती दिली आहे. ही दुःखद माहिती पाहून गायकाच्या चाहत्यांसह सेलिब्रिटींनीही श्रद्धांजली वाहिली आहे.

टॉम पार्करच्या मृत्यूबद्दल माहिती देताना, त्याची पत्नी केल्सीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर टॉमचा एक कुटुंब आणि एकल फोटो शेअर केला आहे. पोस्टच्या पहिल्या ब्लॅक अँड व्हाइट फोटोमध्ये टॉम कॅमेऱ्याकडे पाहताना पोझ देत आहे आणि दुसऱ्या फोटोमध्ये टॉम त्याच्या कुटुंबासह दिसत आहे. हे दोन फोटो शेअर करताना केल्सी म्हणाली, “टॉमचे आज सकाळी (३० मार्च) कुटुंबियांच्या उपस्थितीत निधन झाले. आम्ही दु:खी आहोत, टॉम आमच्या जगाचा केंद्रबिंदू होता आणि आम्ही त्याच्या उपस्थितीशिवाय जीवनाची कल्पना करू शकत नाही. तुमच्या सर्व प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही सदैव ऋणी राहू.”

आणखी वाचा : १ एप्रिल पासून या ५ राशीचे बदलणार भाग्य, मिळणार लक्ष्मी मातेचा आशीर्वाद

आणखी वाचा : या चित्रात तुम्हाला सगळ्यात आधी काय दिसले? यावरून जाणून घ्या तुमचे व्यक्तीमत्त्व

आणखी वाचा : धकधक गर्ल आणि रितेश देशमुखचा ‘कच्चा बादाम’वर डान्स, ४० लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिला हा Viral Video

टॉम आणि केल्सीचे लग्न २०१८ मध्ये झाले होते. लग्नाच्या एक वर्षानंतर, केल्सीने पहिल्या बाळाला जन्म दिला. तर २०२० मध्ये तिने दुसऱ्या बाळाला जन्म दिला. ऑक्टोबर २०२० मध्ये टॉमला कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. त्यानंतर त्याच्यावर केमोथेरपी आणि रेडिओथेरपी सुरू होती पण अखेर त्याने जगाचा निरोप घेतला.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Singer tom parker passes away at the age of 33 due to brain cancer dcp

ताज्या बातम्या