scorecardresearch

‘स्‍लमडॉग मिलेनियर’मधील अभिनेत्रीने लग्नाआधीच दिली गूड न्यूज

सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिने ही आनंदाची बातमी दिली आहे.

‘स्‍लमडॉग मिलेनियर’मधील अभिनेत्रीने लग्नाआधीच दिली गूड न्यूज
फ्रीडाने फोटोग्राफर कॉरी ट्रॅनसोबत २०१९मध्ये साखरपुडा केला

बॉलिवूडमधील हिट चित्रपटांच्या यादीमधील एक चित्रपट म्हणजे ‘स्लमडॉग मिलेनियर.’ या चित्रपटात काम करणारी अभिनेत्री फ्रीडा पिंटोने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली होती. आता फ्रीडा सध्या चर्चेत आहे. या चर्चा फ्रीडाने सोशल मीडियाद्वारे आई होणार असल्याचे सांगितल्यानंतर सुरु झाल्या आहेत.

फ्रीडाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर होणारा पती कॉरी ट्रॅनसोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये फ्रीडा प्रेग्नंट असल्याचे दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने लवकरच तिच्या बाळाचा जन्म होणार आहे या आशयाचे कॅप्शन दिले आहे. तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Freida Pinto (@freidapinto)

आणखी वाचा : ‘पुरुषांनी १० वेळा लग्न केले तरी चालते? पण जेव्हा एखादी महिला…’, शेफाली जरीवालाचा संतप्त सवाल

फ्रीडाने सोशल मीडियाद्वारे गूड न्यूज दिल्यानंतर अनेक कलाकार आणि चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अभिनेत्री नरगिस फाखरीने कमेंट करत ‘तुम्हाला दोघांनाही खूप खूप शुभेच्छा’ असे म्हटले आहे.

फ्रीडाने फोटोग्राफर कॉरी ट्रॅनसोबत २०१९मध्ये साखरपुडा केला. कॅरीच्या वाढदिवशी फ्रीडाने फोटो शेअर करत साखरपुडा केल्याची माहिती दिली होती. त्या दोघांनीही अद्याप लग्न केलेले नाही. आता फ्रीडाने ती प्रेग्नंट असल्याचे सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले आहे. फ्रीडा ही एक भारतीय अभिनेत्री आहे. पण ती ब्रिटीश आणि अमेरिकन चित्रपटांमध्ये काम करताना जास्त दिसते.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या