scorecardresearch

‘लगन’ चित्रपटात अभिनेत्री स्मिता तांबे साकारणार ‘ही’ भूमिका

स्मिता तांबे एका वेगळ्या भूमिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

smita tambe, lagan,
स्मिता तांबे एका वेगळ्या भूमिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री म्हणून स्मिता तांबे ओळखली जाते. चित्रपट, मालिका, वेबसिरीज या माध्यमांतून वेगवेगळ्या भूमिका करत आपल्या अभिनयाच्या छटा दाखवणारी स्मिता आता आपल्या सगळ्यांना लगन या मराठी चित्रपटातून भेटणार आहे. हा चित्रपट ६ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

राधा असं या व्यक्तिरेखेचं नाव आहे. खेडयात राहणारी ऊसतोडणी करणाऱ्या कामगाराची भूमिका स्मिताने साकारली आहे. कणखर तरीही सोज्वळ अशा छटा या व्यक्तिरेखेच्या आहेत. स्मिताचा खेडवळ लूक यामध्ये दिसणार आहे. या व्यक्तिरेखेसाठी स्मिताने स्वत: बैलगाडी चालवली आहे. ऊसाच्या भल्यामोठया मोळया डोक्यावर घेत उन्हातान्हात शूटिंग केलं आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या गावांतून चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे.

आणखी वाचा : भर गर्दीत बाबा सिद्दीकींनी सलमान खानला हात धरून खेचले, आणि..; पाहा हा Viral Video

आणखी वाचा : ३० वर्षांनंतर शनी करणार कुंभ राशीत प्रवेश, ‘या’ ४ राशींचे भाग्य उजळणार

तिच्या भूमिके विषयी बोलताना स्मिता म्हणाली, ‘हे पात्र साकारणं माझ्यासाठी आनंददायी आणि तेवढंच आव्हानात्मक होतं. आपल्या लेकरासाठी काहीही करण्याची प्रत्येक आईची धडपड असते. हे पात्र साकारताना, प्रत्येक आईची ती तळमळ दाखवणं, एवढंच मी या माझ्या भूमिकेतून केलं आहे. तसेच या चित्रपटाच्या निमित्ताने गावातील जीवनपद्धती पुन्हा एकदा जवळून बघता आली याचा ही आनंद आहे’.

आणखी वाचा : समांथासोबत घटस्फोटानंतर नागा चैतन्य पुन्हा अडकणार लग्न बंधनात?

प्रेम माणसाला स्वत:च्या पलीकडे पहायची शक्ती देतं. प्रेमात पडणं जेवढं आनंददायी असतं तितकंच समर्थपणे प्रेम निभावणं अवघड असतं, प्रेमामुळंच नाती जोडली आणि तोडलीही जातात. अडचणींवर मात करत प्रेमाची साथ निभावणार्‍या अनोख्या प्रेमाची गोष्ट ‘लगन’ चित्रपटात ६ मे ला पहायला मिळणार आहे. ‘लगन’ चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन अर्जुन गुजर यांनी केलं आहे. जी.बी.एंटरटेंन्मेंट यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Smita tambe will play this role in lagan movie dcp