PHOTO: लॉस एंजेलिसमध्ये सनी-डॅनियलचा नवा आशियाना

अनेक हॉलिवूड सेलिब्रिटींचे बंगले असलेल्या बेव्हर्ली हिल्स भागात सनी-डॅनियलचा नवा आशियाना आहे.

डेनियल आणि सनीने लॉस एंजेलिस येथे सुंदर आणि भव्य असा बंगला विकत घेतला आहे.

बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनी Sunny Leone गेल्या वर्षभरात फारशी रुपेरी पडद्यावर झळकली नाही. शाहरुख खानच्या ‘रईस’ चित्रपटातील ‘लैला मै लैला’ हे केवळच एकच गाणे तिने २०१६मध्ये केले. या मधल्या काळात ती पती डॅनियलसोबत परदेश दौऱ्यावर गेल्याचे तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पाहावयास मिळाले. तिच्या अमेरिका ट्रीपचे फोटोही तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. पण, सध्या ही अभिनेत्री तिच्या नव्या घरामुळे चर्चेत आली आहे.

नुकताच सनी लिओनीचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त डेनियल आणि सनीने लॉस एंजेलिस येथे सुंदर आणि भव्य असा बंगला विकत घेतला आहे. गेली अनेक वर्ष आम्ही ज्या घराचे स्वप्न पाहिले होते ते अखेर सनीच्या वाढदिवसादिवशी पूर्ण झाले, असे डॅनियलने म्हटलेय. या संपूर्ण घराची सजावट करण्यासाठी त्यांनी इटली, स्पेन, रोम येथून काही कलाकृती आणि वस्तू विकत घेतल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे गणपतीची मूर्ती. त्यांच्या बंगल्याच्या प्रवेशद्वारावर ही मूर्ती ठेवण्यात येणार आहे. स्वतः सनीनेदेखील तिच्या घराचे फोटो ट्विट केले आहेत.

daceicmuiaaceem

daceiccv0aacjux

अनेक हॉलिवूड सेलिब्रिटींचे बंगले असलेल्या बेव्हर्ली हिल्स भागात सनी-डॅनियलचा नवा आशियाना आहे. त्यांच्या या नव्या घरात पाच बेडरुम्स, होम थिएटर, मोठ गार्डन, डायनिंग एरिया आणि स्विमिंग पूल आहे. सध्या सनी अमेरिकेत असून, ती आंतरराष्ट्रीय प्रॉडक्शनसाठी तयारी करत आहे.

1-4

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sneak peek into sunny leones new fancy house in la

ताज्या बातम्या