सोशल मीडियावर अनेकजण रातोरात स्टार होतात. व्हिडीओ, रील आणि डान्स सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. असाच एक सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर म्हणजे किली पॉल (Kili Paul). किली पॉल हा टांझानियाचा असून इन्स्टाग्राम इन्फ्लूएन्सर आहे. किली पॉल हा भारतातील गाण्यांवर रील बनवताना दिसतो. पण आता किलीच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. किली पॉलवक एका अज्ञात व्यक्तीने हल्ला केला आहे.
किलीवर एका अज्ञात व्यक्तीने लाठ्यांनी मारहाण आणि चाकूने हल्ला करण्यात आल्याचे म्हटले जातं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या हल्ल्याचा प्रतिकार करत किवी कसा तरी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला होता. याविषयी किलीने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत सांगितले. त्याचा व्हिडीओ त्याने सध्या त्याच्या युट्यूब अकाऊंटवरून शेअर केला आहे. या पोस्टमध्ये किली म्हणाला, या हल्ल्यात तो जखमी झाला असून त्याला पाच टाके देखील पडले आहेत. किलीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याने एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तो एका बेडवर असून जखमी अवस्थेत असल्याचे दिसत आहे.
आणखी वाचा : “वा राजसाहेब वा, बऱ्याच काळाने…”, राज ठाकरेंच्या भाषणावर शरद पोंक्षेंची प्रतिक्रिया
आणखी वाचा : ‘धर्मवीर’ चित्रपटात बाळासाहेबांची भूमिका साकारणारा अभिनेता, कोण आहे माहितीये का?
भारतीय गाण्यांच्या व्हायरल लिप-सिंकिंग व्हिडीओंमुळे किली वेळोवेळी चर्चेत असतो. त्याने अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘KGF 2’, बीस्ट मधील डायलॉग, पुष्पामधील गाणी, भारतात लोकप्रिय असलेली अनेक गाण्यांवर डान्स करतानाचे व्हिडीओ शेअर केले होते. हे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.
आणखी वाचा : मे महिन्यात या ५ राशीच्या लोकांना मिळेल अमाप संपत्ती, कुबेर देवाचा राहील आशीर्वाद !
आणखी वाचा : “सलाम रॉकी बॉय…”, केजीएफ फेम यशची मुलगी देखील झाली वडिलांची फॅन
आणखी वाचा : प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा ते अक्षय कुमार…, सेलिब्रिटी ‘या’ साइड बिझनेसमधून कमावतात कोट्यावधी रुपये
संपूर्ण भारतात किलीचे कौतुक होताना दिसते. बऱ्याचवेळा सेलिब्रिटी त्याचे व्हिडीओ शेअर करताना दिसतात. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ‘मन की बात’ मध्ये किली पॉल आणि त्याची बहिण नीमा पॉल यांचा उल्लेख करत त्यांचे कौतुक केले होते. तर त्याआधी काही दिवसापूर्वी टांझानियातील भारतीय उच्चायुक्तालयाने किली पॉल याला सन्मानित केलं होत.