scorecardresearch

Video : आत्महत्येच्या तीन दिवसांपूर्वी नाचली, ख्रिसमस सेलिब्रेट केलं, २३ वर्षीय सोशल मीडिया स्टारचा ‘तो’ शेवटचा व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडिया स्टार लीना नागवंशीची आत्महत्या, लीनाचा शेवटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Video : आत्महत्येच्या तीन दिवसांपूर्वी नाचली, ख्रिसमस सेलिब्रेट केलं, २३ वर्षीय सोशल मीडिया स्टारचा ‘तो’ शेवटचा व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडिया स्टार लीना नागवंशीची आत्महत्या, लीनाचा शेवटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माचं आत्महत्येचं प्रकरण ताजं असताना आता आणखी एक दुःखद घटना घडली आहे. सोशल मीडिया स्टार लीना नागवंशीने आत्महत्या करत जीवन संपवलं आहे. छत्तीसगड जिल्हातील विहार कॉलनीमध्ये राहणाऱ्या लीनाने राहत्या घरात गळफास घेतला. ती २३ वर्षांची आहे. लीना सोशल मीडिया स्टार होती. इतकंच नव्हे तर इन्स्टाग्रावर तिचे हजारो फॉलोवर्स होते.

बी.कॉमच्या दुसऱ्या वर्षात शिकणारी लीना छत्तीसगड जिल्हातील विहार कॉलनीमध्ये राहात होती. आई-वडील व भाऊ असा लीनाचा परिवार आहे. रील्स व व्हिडीओमधून तिला सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रियता मिळाली.

आत्महत्येच्या तीन दिवसांपूर्वीचा लीनाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लीना या व्हिडीओमध्ये ख्रिसमस सेलिब्रेट करता दिसत आहे. तसेच ती आनंदाने नाचतानाही दिसतेय. तिचा हा व्हिडीओ पाहून नेटकरीही भावूक झाले आहेत. तीन दिवसांपूर्वी इतकी आनंदी असणाऱ्या लीनाला पाहून तिच्या चाहत्यांनी विविध कमेंट केल्या आहेत.

आणखी वाचा – २३ वर्षीय सोशल मीडिया स्टारची आत्महत्या, घराच्या गच्चीवरच घेतला गळफास

२६ डिसेंबरला लीना दुपारी बाजारात गेली होती. बाजारातून घरी परतल्यावर लीना रुममध्ये नसल्याचं तिच्या आईच्या लक्षात आलं. लीनाला पाहण्यासाठी तिची आई घराच्या गच्चीवर गेली असता दरवाजा बाहेरुन बंद दिसला. बराच वेळ आवाज देऊनही दरवाजा न उघडल्याने कुटुंबियांनी गच्चीचा दरवाजा तोडला. तेव्हा गच्चीवरील एका पाईपाला गळफास घेत लीनाने आत्महत्या केल्याचं आढळलं. पण लीनाच्या आत्महत्येमागचं कारण अजूनही कळू शकलेलं नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-12-2022 at 11:57 IST

संबंधित बातम्या