scorecardresearch

रस्त्यावरील मुलांना ५०० च्या नोटा वाटणे नेहा कक्करच्या आले अंगाशी, पाहा काय घडले

नेहा कक्करचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.

neha kakkar,
नेहा कक्करचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.

बॉलिवूड गायिका नेहा कक्कर ही लोकप्रिय गायिकांपैकी एक आहे. कधी माताच्या चौकीत गाणं गाणारी नेहाचे आज लाखो चाहते आहेत. नेहाने तिच्या आयुष्यात प्रचंड स्ट्रगल केलं आहे. त्याला ती अजूनही विसरलेली नाही. नेहा बऱ्याचवेळा तिच्या लहानपणीच्या स्ट्रगल विषयी बोलली आहे. नेहाने बहीण सोनू कक्करसोबत गाणं गायला सुरुवात केली होती. दरम्यान, नेहा बऱ्याचवेळा गरिबांना मदत करताना दिसते, पण यावेळी मदत करायला गेलीली नेहा अडचणीत अडकली आहे.

नेहाचा हा व्हिडीओ फिल्मीग्यान या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला. या व्हिडीओमध्ये नेहा गरजु लोकांना ५००-५००च्या नोटा वाटताना दिसते. नेहाला पैसे वाटताना पाहून अनेक लोक तिच्या गाडीजवळ जमा झाले. पैसे मिळावे म्हणून लोक मास्क घालून नेहाकडे धावू लागले. त्यामुळे घाबरुन नेहाने गाडीची खिडकी बंद करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण ती खूप अस्वस्थ झाली आणि गाडीच्या सीटवर पुढे सरकली आणि खिडकी बंद करून निघून गेली.

आणखी वाचा : Video : ‘पुष्पा’तील सामी सामी गाण्यावर डेव्हिड वॉर्नरच्या मुलींनी केला भन्नाट डान्स

आणखी वाचा : “सलमान खान अजून अंड्यात आहे…”, बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच अभिजीत बिचुकले बरळला

नेहाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी यावर कमेंट करत म्हणाले, असाच एक व्हिडीओ रश्मिकाचा व्हायरल झाला होता. पण त्या व्हिडीओत रश्मिकाने गरजुंना पैसे दिले नाही. तर काही नेटकऱ्यांनी नेहाची स्तुती केली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Social neha kakkar got mobbed by people as she was distributing 500 rupees dcp

ताज्या बातम्या