‘इम्रान हाश्मी हा एक…’, सोहा अली खानने केला धक्कादायक खुलासा

इम्रान आणि सोहाने ‘तूम मिले’ या चित्रपटात एकत्र काम केले होते.

soha ali khan,emraan hashmi,tum mile,emraan hashmi unprofessional,soha ali khan interview,

अभिनेत्री सोहा अली खानने काही मोजक्याच चित्रपटांमध्ये काम करत बॉलिवूडमध्ये स्वत:ची अशी वेगळ ओळख निर्माण केली आहे. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. तिने बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मीसोबत ‘तुम मिले’ या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटात इम्रानसोबत काम करण्याविषयी तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे.

सोहाने नुकतीच बॉलिवूड हंगामाला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिला इम्रान हाश्मी आणि आर माधवन यांच्यामधील एकाची कोस्टार म्हणून निवड करण्यास सांगण्यात आले होते. सोहा आणि आर माधवनने ‘रंग दे बसंती’ चित्रपटात एकत्र काम केले होते. पण सोहाने या प्रश्नावर दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
Kissing सीनदरम्यान कट म्हटल्यानंतरही ‘या’ अभिनेत्री स्वत:ला थांबवू शकल्या नाहीत, पाचवे नाव वाचून बसेल धक्का

सोहा अली खान म्हणाली, ‘मी इम्रानसोबत खरं तर जास्तवेळ काम केले आहे. कारण त्या चित्रपटातील भूमिका ही मोठी होती. मला दोघांसोबतही काम करताना मजा आली होती. पण मी इम्रानची निवड करेन. कारण माधवन पेक्षा इम्रानने मला इंप्रेस केले होते. मला वाटले होते इम्रान हा खूप वेगळा आहे. पण इम्रान हाश्मी हा एक खूप प्रोफेशनल अभिनेता आहे. तो वेळेत सेटवर येतो आणि त्याच्यासोबत काम करताना मला खरच खूप चांगले वाटले. मला माहिती नाही पण सुरुवातील तो एक चांगला अभिनेता नाही असे वाटले होते.’

पुढे सोहा म्हणाली, ‘मला असे वाटले होते की तो सकाळी फार उशिरा उठत असेल आणि त्याला त्याचे डायलॉग लक्षात नसतील, तो चांगला अभिनेता नसेल. पण खरच माहिती नाही का.. मी त्याचे कामही पाहिले नव्हते. पण तो खरच खूप वेगळा आहे. समोरच्या व्यक्तीला समजवून घेतो आणि खूप चांगला अभिनेता आहे.’

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Soha ali khan says she thought emraan hashmi would not be such a good actor avb

Next Story
अभिनेते किरण मानेंवर महिलांशी गैरवर्तन आणि शिवीगाळ केल्याचा आरोप, आता अनेक महिला सहकलाकार पुढे सरसावल्या, म्हणाल्या…
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी