scorecardresearch

“काही लोक विमानतळावर जातात पण…” करण जोहरने नाव न घेता उर्फी जावेदची उडवली खिल्ली

सध्या ‘कॉफी विथ करण’ या शोचे सातवे पर्व सुरु आहे. या शोमध्ये आतापर्यंत रणवीर सिंग, आलिया भट्ट ते आमिर खान या कलाकारांनी हजेरी लावली आहे.

“काही लोक विमानतळावर जातात पण…” करण जोहरने नाव न घेता उर्फी जावेदची उडवली खिल्ली
करणने नाव न घेता उर्फी जावेदची खिल्ली उडवली.

करण जोहर हे बॉलिवूडमधील एक वादग्रस्त नाव आहे. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर त्यावर बरीच टीका करण्यात आली होती. करण जोहर केवळ स्टार किड्सना संधी देतो असा आरोप त्याच्यावर वारंवार करण्यात आला आहे. त्यातच त्याचा ‘कॉफी विथ करण’ हा शोदेखील तितकाच वादग्रस्त आहे. या शोमध्ये करण्यात येणाऱ्या विधानांवरून अनेक चर्चांना तोंड फुटते. या शोमध्ये करणने अनेक कलाकारांना त्यांच्या सेक्स लाइफबद्दलही अनेक प्रश्न विचारले आहेत.

सध्या ‘कॉफी विथ करण’ या शोचे सातवे पर्व सुरु आहे. या शोमध्ये आतापर्यंत रणवीर सिंग, आलिया भट्ट ते आमिर खान या कलाकारांनी हजेरी लावली आहे. नुकतंच सोनम कपूर आणि अर्जुन कपूर यांनी या शोमध्ये उपस्थिती दर्शवली. सोनल कपूर ही बॉलिवूडमधील फॅशन आयकॉन म्हणून ओळखली जाते. साहजिकच यावेळी कान फिल्म फेस्टिव्हलबाबतही चर्चा झाली. यादरम्यान करणने नाव न घेता उर्फीची खिल्ली उडवली, जी उर्फी जावेदच्या चाहत्यांना आवडली नाही.

Photos : रक्षाबंधनानिमित्त घातलेल्या ड्रेसमुळे निया शर्मा ट्रोल; नेटकरी म्हणाले, “आज तरी…”

११ ऑगस्टला ‘कॉफी विथ करण’ सिजन ७चा सातवा एपिसोड रिलीज झाला. सोनम कपूर आणि अर्जुन कपूर या भावंडांनी या एपिसोडमध्ये हजेरी लावली. यावेळी करणने सोनमला कान फेस्टिव्हलच्या संबंधित प्रश्न विचारला. याचदरम्यान, करणने नाव न घेता उर्फी जावेदच्या खिल्ली उडवली. करण म्हणाला, “असे काही इन्फ्लुएन्सर्स आहेत जे तयार होऊन एअरपोर्टला जातात, मीडियाशी बोलतात, पण कधीही फ्लाइट पकडत नाहीत.”

उर्फीलाही अनेकदा एरपोर्टवर जाण्याबाबत प्रश्न विचारण्यात आले आहेत. जेव्हा उर्फी जावेदला विचारण्यात आले की ती दररोज एअरपोर्टवर का जाते? तेव्हा ती म्हणाली होती की, मी मला हवं ते करेन, त्याच्याशी तुम्हाला काय देणंघेणं आहे? आता करणच्या या विधानावर उर्फी कसा प्रतिसाद देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Some people go to the airport but wont catch flight karan johar mocked urfi javed without taking names pvp

ताज्या बातम्या