अनदेखी सीजन २

‘सोनी लिव्ह’ वाहिनीवरील ‘अनदेखी’ या वेबमालिकेचे दुसरे पर्व लवकरच प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. एका रात्रीत घडलेला गुन्हा, गुन्हेगाराला शिक्षा व्हायलाच हवी म्हणून धडपडणारे काहीजण आणि या लोकांपासून पळणारा गुन्हेगार असा पाठशिवणीचा खेळ या पर्वात पहायला मिळणार आहे. गेल्या पर्वातील पोलीस अधिकारी घोष, तेजी, कोयल, रिंकू या व्यक्तिरेखांबरोबरच या पर्वात काही नव्या व्यक्तिरेखांचाही समावेश होणार आहे. नंदीश संधू, मियांग चँग आणि तेज सप्रू हे नवे चेहरे या पर्वात पहायला मिळणार आहेत. मागच्या पर्वात कोयलला रिंकू शर्माच्या तावडीतून सोडवण्यासाठी तेजीने केलेले प्रयत्न महत्त्वाचे ठरले होते. या पर्वात घडलेल्या घटनेमुळे सगळयांच्या आपापसातील बदललेल्या नातेसंबंधांवरही प्रकाश टाकण्यात आला आहे. या वेबमालिकेची निर्मिती अ‍ॅपलॉज एन्टरटेन्मेटने बनिजय एशिया एन्टरटेन्मेंटच्या सहकार्याने केली आहे. तर वेबमालिकेचे दिग्दर्शन आशिष आर. शुक्ला यांनी केले आहे. प्रेम, सत्ता आणि सूडाचा हा खेळ मागच्या पर्वाप्रमाणेच याही पर्वात प्रेक्षकांना आवडेल, अशी अपेक्षा निर्मात्यांनी व्यक्त केली आहे.

actor pratik gandhi talks about experience working with vidya balan
‘चरित्रपटांचं आव्हान अधिक भावतं’
ms dhoni thala joined hands being thankful to fan in ekana cricket stadium lsg vs csk ipl 2024 live match
थालाच्या भरमैदानातील ‘त्या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मने; VIDEO पाहून म्हणाले, “वॉव…”
IPL Matches Boost BEST Revenue, 500 Buses Used, Bring Children to Wankhede Stadium, best buses in ipl, best bus ipl, best bus revenue ipl, indian premier league best bus,
आयपीएलमुळे बेस्टला ८० लाखांचे उत्पन्न
This video of an elderly cobbler and two stray dogs in Mumbai
“जगातील सर्व श्रीमंतापेक्षा श्रीमंत आहे हा व्यक्ती”! भटक्या कुत्र्यांना प्रेमाने थोपटणाऱ्या काकांचा हृदयस्पर्शी Video Viral

कलाकार – हर्ष छाया, सूर्य शर्मा, दिब्येंदु भट्टाचार्य, आंचल सिंह, अपेक्षा पोरवाल, अंकुर राठी, नंदीश संधू, मियांग चँग आणि तेज सप्रू.

कधी – ४ मार्च, कुठे -सोनी लिव्ह

अ थर्सडे

मानसिकदृष्टय़ा अस्थिर असलेली लहान मुलांची शिक्षिका नैना (यामी गौतम) हिच्या व्यक्तिरेखेवर आधारित ‘अ थर्सडे’ फिल्मचा प्रोमो पाहिल्यानंतर नसीरुद्दीन शहा आणि अनुपम खेर जोडीचा ‘अ वेनस्डे’ आठवल्याशिवाय राहत नाही. नैनाने शाळेतील लहान मुलांचे अपहरण केले आहे. आपल्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर या मुलांना ठार करेन अशी धमकी नेहा देते. मग शाळेच्या बाहेर आणि आत असा वेगळाच खेळ रंगू लागतो, प्रेक्षकांना थरारपट नेहमीच आकर्षित करतात. त्यामुळे ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या बव्हंशी वेबमालिका आणि चित्रपट हे याच धाटणीच्या कथानकांवर आधारित असलेले पहायला मिळतात. ‘अ थर्सडे’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन बेहझाद खंबाटा यांनी केले आहे, तर निर्मिती रॉनी स्क्रूवाला यांची आहे. चित्रपटात अभिनेत्री यामी गौतम मध्यवर्ती भूमिकेत आहे. एक साधी शिक्षिका पूर्ण देशाला हलवून सोडते, असे कथानक असलेल्या या चित्रपटात यामीबरोबर डिंपल कपाडिया, नेहा धूपिया, अतुल कुलकर्णी असे चांगले कलाकार एकत्रित आले आहेत. त्यामुळे कथानक आणि अभिनय दोन्ही दृष्टीने हा चित्रपट पर्वणी ठरेल.

कलाकार – यामी गौतम, डिंपल कपाडिया, नेहा धूपिया, अतुल कुलकर्णी, करणवीर शर्मा, आदि इराणी , कधी –  प्रदर्शित, कुठे – डिस्ने हॉटस्टार