प्रसिद्ध पार्श्वगायक कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच ‘केके’चं मंगळवारी (३० मे) रात्री कोलकात्यामध्ये निधन झाले. ‘वॉईज ऑफ लव्ह’ अशी ओळख असणारे कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच ‘केके’च्या मृत्यूमुळे चाहत्यांना जबरदस्त धक्का बसला आहे. कोलकात्यामध्ये लाइव्ह कॉन्सर्टदरमध्ये अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला, त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या निधनानंतर अनेक दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘केके’च्या निधनानंतर अभिनेत्री सोना मोहपात्रा हिला जबरदस्त धक्का बसला आहे. ‘केके’ने पुरानी जीन्स या चित्रपटातील दिल आज कल हे गाणे गायले होते. यानंतर अभिनेत्री सोना मोहपात्रा हिने यावर एक प्रतिक्रिया दिली आहे.

‘हिंदुस्तान टाईम्स’शी बोलताना सोना म्हणाली, “केके यांच्या निधनाची बातमी ऐकल्यापासून मला धक्का बसला आहे. काही सेकंद माझ्या मेंदूने काम करणे बंद केले. मलाही अशाचप्रकारे लाइव्ह कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करता करता मरण यावं असं वाटतं आहे. मला माझे जीवन हे संगीतमय पद्धतीने घालवायचे आहे.”

“स्पॉटलाइट बंद करा, मला त्रास…” गायक ‘केके’ अखेरच्या क्षणी नेमकं काय म्हणाला होता?

“केके स्टेजवर फार छान गाणे गायचा. त्याचा वादासोबत काहीही संबंध नव्हता. वादाशी त्याचा काही संबंध नव्हता. तो फार साधेपणाने त्याचे जीवन जगायचा. तो नेहमी आपल्या शब्दावर ठाम राहायचा. त्याने कधीही कोणाला पराभूत करण्याचा विचार केला नाही. तो नेहमी काम करायचा, त्याने कधीही पार्टी केलेली नाही. विशेष म्हणजे तो कोणत्याही गटाचा भाग बनला नाही. एक ज्येष्ठ संगीतकार या नात्याने तो नेहमीच माझ्याशी चांगले वागायचा. कधीही चिडायचा नाही, असेही तिने म्हटले.

कोलकाता फार भाग्यवान आहे कारण त्यांना ‘केके’च्या शेवटच्या दिवसात त्याचं लाइव्ह गाणं ऐकण्याचे भाग्य लाभले. मला खात्री आहे की तो स्वर्गातही गात असेल. अनेक संगीतकार आणि संगीतप्रेमींचे हे फार मोठे नुकसान आहे, असेही सोना म्हणाली.

“अभी अभी तो मिले हो, अभी न करो छूटने की बात…”; ‘केके’च्या शेवटच्या परफॉर्मन्सचा व्हिडीओ व्हायरल

‘केके’ याने माचीस (छोड़ आये हम वो गल्ल्यां) या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण ‘केके’ ला खरी ओळख ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटातून मिळाली. त्यात त्याने ‘तडप तडप के इस दिल से’ हे गाणे गायले होते. ‘केके’ याचा जन्म २३ ऑगस्ट १९६८ रोजी दिल्लीत झाला होता. ‘केके’ यांनी हिंदी व्यतिरिक्त तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, मराठी, बंगाली आणि गुजराती चित्रपटांमध्ये गाणी गायली होती.