प्रसिद्ध गायिका सोना मोहापात्रा ही सिनेसृष्टीत नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. ती नेहमीच विविध चर्चेत असलेल्या मुद्द्यावर भाष्य करत स्वत:चे मत मांडताना दिसते. नुकतंच सोना मोहापात्रा हिने दाक्षिणात्य विरुद्ध हिंदी भाषा वादावर स्पष्ट मत मांडले. हिंदी सिनेसृष्टीत काम करुनही अनेक बॉलिवूड कलाकारांना अद्याप हिंदी भाषा बोलता येत नाही, ही लाजिरवाणी बाब आहे, असे तिने म्हटले.

सोना मोहापात्रा ही नेहमीच तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. नुकतंच एका मुलाखतीदरम्यान तिने दाक्षिणात्य विरुद्ध हिंदी भाषा वादावर स्पष्टीकरण दिले. त्यावर ती म्हणाली, “अनेक दक्षिण भारतीय चित्रपटातील कलाकार हे स्वत:ची संस्कृती अंगीकारत आहेत. तर काही हिंदी चित्रपट अभिनेत्यांना हिंदी भाषादेखील धड बोलता येत नाही. त्यासाठी ते धडपडत आहेत.”

“मलाही अशाचप्रकारे लाइव्ह कॉन्सर्टमध्ये मरण यावं…”, प्रसिद्ध अभिनेत्रीचे वक्तव्य चर्चेत

“मी एक गोष्ट नक्की सांगू शकते की मी RRR आणि पुष्पा हे दोन्ही चित्रपट पाहिले. हे चित्रपट पाहिल्यानंतर मी एक गोष्ट सांगू शकते की त्यांना सलाम! यात केलेला प्रयत्न, कला दिग्दर्शन, कास्टिंग सर्वच विलक्षण होते. त्यांना त्यांची संस्कृती स्वीकारताना पाहून फार आनंद झाला,” असे सोना मोहापात्रा म्हणाली.

“आपल्याकडे बॉलिवूडमध्येही अनेक उत्कृष्ट कलाकार आहेत. पण त्यात काही असे कलाकारदेखील आहेत, ज्यांना नीट हिंदीदेखील बोलता येत नाही आणि ही लाजिरवाणी गोष्ट आहे. कारण हिंदी चित्रपट अभिनेत्याला ती भाषा बोलण्यास यायला हवी, ते आवश्यक आहे. दक्षिणेकडील चित्रपटात भारतीय सौंदर्यशास्त्र खूप मजबूत आहे,” असेही तिने म्हटले.

“लोकांनी कितीही टीका केली तरी…”, ‘बिग बॉस’ फेम पराग कान्हेरेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

दरम्यान सोना ही सध्या बॉलिवूडमध्ये पार्श्वगायिका म्हणून काम करत आहे. ती सध्या लाइव्ह शो करण्यावर जास्त लक्ष केंद्रीत करत आहे. पण याचा अर्थ ती सिनेसृष्टी सोडत आहे, असा होत नाही, असेही तिने स्पष्टीकरण दिले. ती लवकरच शट अप सोना या डॉक्युमेंट्रीमध्ये झळकणार आहे. ही डॉक्युमेंट्री एका गायिकेवर आधारित आहे.