हॅलोवीन पोस्ट करणं हुमा कुरैशीला पडलं महागात, सोनाक्षीने कायदेशीर नोटीस पाठवण्याची दिली धमकी

जाणून घ्या काय होती हुमाची पोस्ट

जाणून घ्या काय होती हुमाची पोस्ट

सोमवारी बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने हुमा कुरैशीला ‘कायदेशीर नोटीस’ पाठवण्याची मजेशीर अंदाजात धमकी दिली आहे. सोनाक्षीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने हुमाने शेअर केलेल्या पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. सोनाक्षीची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.

हुमा कुरैशीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये हुमाचा चेहरा दिसत नाही कारण तिने चेहरा मास्कने झाकला आहे. तसेच तिचे केवळ डोळे दिसत आहेत. हुमाने काळ्या रंगाचा आऊटफिट परिधान केला आहे. तिच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करताना दिसत आहेत. दरम्यान सोनाक्षीने हा फोटो शेअर करत दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
Video: आर्यनच्या सुटकेसाठी हनुमान चालिसाचा जाप करत ‘मन्नत’च्या बाहेरच मारली बैठक!

सोनाक्षीने हुमाच्या या फोटोचा स्क्रीनशॉट काढून इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने ‘माझा फोटो माझ्या परवानगी शिवाय कसा शेअर केला आहेस? तेही तुझा आहे सांगत. मी तुला कायदेशीर नोटीस पाठवेन’ या आशयाचे मजेशीर कॅप्शन दिले आहे. सध्या हुमाचा हा फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहे.

हुमा काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमारच्या ‘बेलबॉटम’ या चित्रपटात दिसली होती. त्यानंतर आता ती बोनी कपूरचा चित्रपट ‘वलीमाई’मध्ये दिसणार आहे. तर, सोनाक्षी हॉरर कॉमेडी चित्रपट ‘काकुडा’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात रितेश देशमुख आणि साकिब सलीम देखील दिसणार आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sonakshi sinha sending legal notice to huma qureshi due this reason avb

ताज्या बातम्या