scorecardresearch

Premium

सोनाक्षी सिन्हाला दिलासा! ‘त्या’ प्रकरणात चार वर्षांनी मिळणार तब्बल २९ लाख रुपये

न्यायाधिकरणाच्या निर्णयानंतर सोनाक्षी सिन्हाला २९ लाख रुपये मिळणार आहेत.

sonakshi
(Photo – Indian Express)

आयकर अपील न्यायाधिकरणाच्या मुंबई शाखेने अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला आयटी प्रकरणात दिलासा दिला आहे. न्यायाधिकरणाने अभिनेत्रीच्या बाजूने निकाल देत तिचा २९ लाख रुपयांचा विदेशी कर क्रेडिट दावा मंजूर केला आहे. एका आयकर अधिकाऱ्याने सोनाक्षी सिन्हाचा टॅक्स क्रेडिट क्लेम फॉर्म स्वीकारण्यास नकार दिल्याने ही बाब उघडकीस आली होती. दरम्यान आता न्यायाधिकरणाच्या निर्णयानंतर सोनाक्षी सिन्हाला २९ लाख रुपये मिळणार आहेत.

ETimes ने दिलेल्या वृत्तानुसार, २०१७-१८ साली सोनाक्षीचे कर विवरणपत्र तिच्या दाव्याची पात्रता तपासण्यासाठी निवडले गेले होते. यादरम्यान, आयकर अधिकाऱ्याने दावा केला होता की अभिनेत्रीने २२ सप्टेंबर २०१८ रोजी तिचे रिटर्न भरले होते, परंतु टॅक्स क्रेडिट क्लेमसाठी २० जानेवारी २०२० रोजी फॉर्म ६७ दाखल केला होता. अशा परिस्थितीत, अभिनेत्रीने कर भरण्याच्या तारखेनंतर फॉर्म भरला, जे नियमांच्या विरोधात आहे. त्या उशीरामुळे तिला टॅक्स क्रेडिट क्लेम मिळू शकला नाही. त्यानंतर हे प्रकरण ITAT कडे पोहोचले होते.

Baby Declared Dead By Hospital starts Crying Seconds Before Cremation Last Rites Father Tells Whole Story Pregnant Wife
८ तास बाळाचं निरीक्षण, डॉक्टरांनी मृत घोषित केलं; अंत्यसंस्काराच्या क्षणी बाळानेच..वडिलांनी सांगितलं प्रकरण
22 year old youth released on bail in rape case
‘पॉक्सो’ संमती वयात फेरफार न करण्याचा केंद्राला सल्ला; विधि आयोगाचा अहवाल सादर
five decision of shinde fadnavis government taken back in one and a quarter years
उलटा चष्मा : मर्यादा २५ हजार करून टाका!
contract work tds
Money Mantra: कंत्राटी आणि व्यावसायिक देण्यांवर किती टीडीएस बसतो?

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने गेल्या महिन्यात टॅक्स क्रेडिट नियमांमध्ये बदल केले आहेत. नियमानुसार, कोणताही करदाता आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी किंवा त्यापूर्वी क्रेडिट क्लेमसाठी फॉर्म दाखल करू शकतो. हा नियम २०२२-२३ आणि त्यानंतरच्या फॉरेन टॅक्स क्रेडिटच्या दाव्यांना लागू होईल. सोनाक्षीला तब्बल चार वर्षांनी २९ लाख रुपये रक्कम मिळणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sonakshi sinha will get 29 lakh back in income tax claim case hrc

First published on: 26-09-2022 at 18:34 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×