Photo : सोनाक्षीच्या आयुष्यात कोण आलंय ठाऊक आहे?

सोनाक्षीचा हा नवा पाहुणा चाहत्यांच्या पसंतीत उतरल्याचं पाहायला मिळत आहे.

sonakshi sinha
सोनाक्षी सिन्हा

अभिनेता सलमान खानसोबत २०१० मध्ये दबंग या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला आता बॉलिवूडमध्ये एक दशक उलटून गेलं आहे. या कारकिर्दीमध्ये ती सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. सोनाक्षी अनेक वेळा तिच्या आयुष्यातील लहान लहान घटनाही चाहत्यांसोबत शेअर करत असते. अशातच सोनाक्षीने तिच्या घरी एका नव्या पाहुण्याचं आगमन झाल्याची माहिती सोशल मीडियावर दिली आहे.

सोनाक्षीने इन्स्टाग्रामवर तिच्या घरातील नव्या पाहुण्याचा एक फोटो शेअर केला असून त्यासोबतच एक व्हिडिओही शेअर केला आहे. विशेष म्हणजे सोनाक्षीचा हा नवा पाहुणा चाहत्यांच्या पसंतीत उतरल्याचं पाहायला मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

Sona with her new baby bronze @aslisona

A post shared by Sonakshi Sinha (@sonakshi.princess) on

सोनाक्षीच्या नव्या पाहुण्याचं नाव ब्रॉन्झ असं असून ते एक लहानसं कुत्र्याचं पिल्लू आहे. सोनाक्षीने ब्रॉन्झचा फोटो शेअर करुन त्याचं स्वागत केलं आहे. ब्रॉन्झपूर्वी सोनाक्षीकडे नॅन्सी नावाचाही एक कुत्रा होता. त्यामुळे ब्रॉन्झ हा सोनाक्षीकडे आलेला दुसरा नवा पाहुणा आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sonakshi sinhas new baby named bronze

ताज्या बातम्या