सोनाली कुलकर्णीच्या लग्नाला यायचं हं! अभिनेत्रीनेच दिलं निमंत्रण, स्थळ आणि तारीखही ठरली | sonalee kulkarni kunal benodekar wedding video release on planet marathi ott platform | Loksatta

सोनाली कुलकर्णीच्या लग्नाला यायचं हं! अभिनेत्रीनेच दिलं निमंत्रण, स्थळ आणि तारीखही ठरली

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा विवाहसोहळा प्रेक्षकांना आता ओटीटीवर पाहता येणार आहे.

सोनाली कुलकर्णीच्या लग्नाला यायचं हं! अभिनेत्रीनेच दिलं निमंत्रण, स्थळ आणि तारीखही ठरली
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा विवाहसोहळा प्रेक्षकांना आता ओटीटीवर पाहता येणार आहे.

मराठी चित्रपटसृष्टीची ‘अप्सरा’ अर्थातच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोनालीने ७ मे २०२१ रोजी कुणाल बेनोडेकरबरोबर लग्न केलं. पण तिने हे लग्न कोर्टात केल्यामुळे तिला कोणतीच हौस करता आली नाही. म्हणूनच सोनालीने याचवर्षी मे महिन्यामध्ये पुन्हा एकदा कुणालशी लग्न केलं. या संदर्भात एक पोस्ट देखील सोनालीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केली होती.

आणखी वाचा – “आताच्या अभिनेत्यांना तरुण अभिनेत्री हव्या आणि…” नीना गुप्ता असं का म्हणाल्या?

यावर्षी सोनाली-कुणालचा विवाहसोहळा पुन्हा एकदा पार पडला. त्यांचा हाच शाही विवाहसोहळा प्रेक्षकांना प्लॅनेट मराठी ओटीटीवर पाहता येणार आहे. आज पती कुणालच्या वाढदिवसानिमित्त तिने एक खास व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली. या व्हिडीओच्या माध्यमातून तिने चाहत्यांना आपल्या लग्नाचं निमंत्रण दिलं आहे.

एखाद्या मराठी कलाकाराच्या विवाह सोहळ्याचे ओटीटीवर प्रक्षेपण करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामध्ये सोनाली आणि कुणाल यांचा लंडनमध्ये पार पडलेला संपूर्ण विवाहसोहळा, वऱ्हाडींची धुमधाम, लग्नातील विधी हे सर्व पाहाता येणार आहे. सोनाली याबाबत म्हणते, “प्लॅनेट मराठी ओटीटीवर पहिल्यांदाच एका मराठमोळ्या अभिनेत्रीच्या लग्नसोहळ्याचे प्रक्षेपण केलं जात आहे. ज्यांना माझ्या लग्नसोहळ्याला उपस्थित राहाता आले नाही त्यांना आणि माझ्या जगभरातील चाहत्यांना माझ्या आयुष्यातील हा सर्वात आनंददायी क्षण अनुभवायला मिळेल.”

आणखी वाचा – “तुम्ही प्लास्टिक सर्जरी केली आहे का?” प्रश्नावर अमृता फडणवीसांचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या, “मला ट्रोल केलं पण…”

येत्या ११ ऑगस्टला प्लॅनेट मराठीवर सोनालीच्या लग्नाचा व्हिडीओ प्रदर्शित होईल. लंडनमध्ये सोनाली-कुणालचा विवाहसोहळा कसा पार पडला हे लवकरच प्रेक्षकांना अनुभवता येईल.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-08-2022 at 19:25 IST
Next Story
रणबीर कपूरचा ‘शमशेरा’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप, करीना कपूर म्हणाली, “मला हा अधिकार…”