अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि राज ठाकरे यांनी ३० ऑक्टोबर १९९६ मध्ये मुंबई विमानतळावर मायकल जॅक्सनचं मराठमोळ्या अंदाजात स्वागत केलं होतं. त्यावेळी मायकल जॅक्सनच्या स्वागतासाठी सोनाली बेंद्रे छान नऊवारी साडी नेसून उपस्थित होती. तिचा तो व्हिडीओ आजही सोशल मीडियावर व्हायरल होत असतो. आता अभिनेत्रीने यामागची खरी गोष्ट सांगितली आहे.

माधुरी दीक्षित सूत्रसंचालन करत असलेल्या ‘कोण होणार करोडपती’मध्ये सोनाली बेंद्रेने हजेरी लावली आहे. यावेळी माधुरीने तिला याबद्दल विचारल्यानंतर सोनालीने तो संपूर्ण किस्सा आणि त्यामागची मूळ गोष्ट सांगितली. सोनी टीव्हीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये माधुरी म्हणाली, “मायकल जॅक्सन इतका श्रेष्ठ नर्तक मी त्याची चाहती आहे. तो जेव्हा मुंबईला आलेला तेव्हा तू नऊवारी साडी नेसून टिळा लावून त्याचं स्वागत केलं तो अनुभव कसा होता?”

सोनालीने सांगितला मायकल जॅक्सनचा किस्सा

माधुरीने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना सोनाली म्हणाली, “खरं तर मी त्याची चाहती नव्हते. मला त्यांनी म्हटलं होतं की आम्हाला मराठी मुलगी हवी आहे. त्यावेळेला मला माझ्या कुटुंबासाठी आणि मैत्रिणींसाठी तिकिटे मिळाली आणि नऊवारीबद्दल मला फार उत्सुकता होती माझी आजी नेसायची. त्यामुळे मी खूप उत्सुक होते पण त्यानंतर जेव्हा मी कॉन्सर्टला गेले ना तेव्हा मला समजलं की तो किती श्रेष्ठ कलाकार आहे. खूप कमाल आहे तो. खूप कमाल गातो त्यानंतर मी त्याचा चाहता झालो.

अलीकडेच लोकमत फिल्मीला दिलेल्या मलाखतीत सोनालीने सांगितलं की त्यावेळी तिला तिच्या मैत्रिणींला, तिच्या बहिणींना आणि त्यांच्या मैत्रिणींनाही मोफतं तिकिटं मिळाली होती आणि सर्वजण मायकल जॅक्सनच्या कॉन्सर्टला गेले होते.

दरम्यान, माधुरी दीक्षित पहिल्यांदाच सूत्रसंचालन करत असलेला ‘कोण होणार करोडपती हा शो आजपासून १२ ऑक्टोबरपासून रात्री ९ वाजता सोनी मराठीवर प्रसारित होणार आहे. या पहिल्याच भागात सोनाली बेंद्रे उपस्थित राहणार आहे. त्यामुळे या पहिल्याच भागात माधुरी दीक्षित व सोनाली बेंद्र यांना एकत्र पाहता येणार आहे. सोनालीच्या आधी अभिनेते नाना पाटेकर या कार्यक्रमात हजेरी लावणार होते.मात्र त्यांच्या अकाली झालेल्या निधनानंतर त्यांच्याजागी सोनाली बेंद्रे झळकणार आहे.