सोशल नेटवर्किंगवर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. सध्या सोशल नेटवर्किंगवर सगळ्यात चर्चेचा विषय आहे तो आपण म्हातारपणी कसे दिसू यासंदर्भातील फोटोंचा ट्रेण्ड. मुळात हा ट्रेण्ड अचानक व्हायरल होण्यामागील कारण आहे फेसअॅप. या फेस अॅपद्वारे सोनम कपूर, दीप-वीर, अर्जुन कपूर अशा अनेक बॉलिवूड कलाकरांनी फेसअॅप वापरुन ते म्हातारपणी कसे दिसणार याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये मराठी कलाकारही मागे नाहीत. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने ती ८० वर्षांची झाल्यावर कशी दिसणार याचा फोटो शेअर केला आहे.

सोनालीने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सोनालीने फेसअॅप वापरुन ती म्हातारपणी कशी दिसणार याचा फोटो शेअर केला. या फोटोमध्ये सोनाली एकदम अनोख्या अंदाजात दिसत आहे. तिने पांढऱ्या रंगाचा टीशर्ट परिधान केला आहे. फोटो म्हातारपणीचा असला तरी सोनाली तितकीच सुंदर दिसत आहे. सध्या तिचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सध्या सोनाली तिचा आगामी चित्रपट ‘झिम्मा’च्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाचे सध्या लंडनमध्ये चित्रीकरण सुरु आहे.

काय आहे फेसअॅप

फेसअॅप हे २०१७ साली लॉन्च करण्यात आले होते. अॅप लॉन्च झाल्यानंतरही ते चांगलेच चर्चेत आले होते. सध्या हे अॅप अचानक चर्चेत आले आहे. मुळात अचानक हे अॅप वापरणाऱ्यांचे आणि त्यावरील फोटो व्हायरल होण्याचे नक्की कारण काय आहे हे समोर आले नसले तरी हजारोच्या संख्येने नेटकरी हे अॅप वापरुन त्यांच्या म्हातारपणीचा लूक शेअर करताना दिसत आहेत. खरे तर या अॅपमध्ये इन्स्टाग्रामप्रमाणे अनेक फिल्टर्स आहेत मात्र त्यातील ओल्ड फेस फिल्टर खूपच लोकप्रिय झाले असून या फिल्टरचा वापर करुनच अनेकजण भविष्यातील स्वत:कडे पाहत आहेत. हे फिल्टर मोफत असल्याने अनेकजण ते ‘ट्राय करुन तर बघू’ म्हणत वापरुन पाहताना दिसत आहेत. या अॅपमध्ये अनेक फिल्टर आहेत. म्हणजे तरुण रुप पाहण्यासाठीचे फिल्टर, केसांचा रंग बदलण्याचे, चेहऱ्यावर मेकअप करण्याचे तसेच क्रूर हास्य चेहऱ्यावर आणण्याचेही फिल्टर या अॅपमध्ये आहे.