scorecardresearch

सोनाली फोगट यांच्या बहिणीने व्यक्त केला हत्येचा संशय; म्हणाल्या, “जेवणात काही तरी…”

सोनाली फोगट यांच्या बहिणीने त्यांच्या निधनाबद्दल संशय व्यक्त केला आहे.

सोनाली फोगट यांच्या बहिणीने व्यक्त केला हत्येचा संशय; म्हणाल्या, “जेवणात काही तरी…”
भाजप नेत्या आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगट निधन

प्रसिद्ध टिकटॉक स्टार आणि भाजपा नेत्या सोनाली फोगट यांचे निधन झाले आहे. त्या ४१ वर्षांच्या होत्या. आज (२३ ऑगस्ट) सकाळी हृदविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाच्या बातमीने लाखो चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. अशातच आता त्यांच्या बहिणीने सोनाली फोगट यांच्या निधनाबद्दल संशय व्यक्त केला आहे.

हेही वाचा – सोनाली फोगाट यांच्या निधनानंतर बहिणीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “आईला रात्री फोन केला आणि…”

सोनाली फोगट यांच्या बहिणीने त्यांचा मृत्यू नसून हत्या असल्याचं संशय व्यक्त केलाय. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांच्या बहिणीने सांगितले की, “सोनालीने घरी फोन करून जेवण खाल्ल्यानंतर अस्वस्थ वाटत असल्याची तक्रार केली होती. सोनालीला तिच्या जेवणात कोणी तरी काहीतरी मिसळल्याचा संशय तिने आईशी फोनवर बोलताना व्यक्त केला. तसेच तिला जीवे मारण्यासाठी कुणी तरी कट रचत असल्याचा संशयही सोनालीने आईशी बोलताना व्यक्त केला होता, त्यानंतर सकाळी आम्हाला तिच्या मृत्यूची बातमी मिळाली,” अशी माहिती तिच्या बहिणीने दिली. यासंदर्भात इंडिया टुडेने वृत्त दिलंय.

मात्र, सोनाली फोगटच्या मृत्यूशी संबधित काहीही संशयास्पद असण्याची शक्यता पोलिसांनी नाकारली आहे. गोव्याचे डीजीपी जसपाल सिंग म्हणाले, “आतापर्यंत आम्हाला काहीही संशयास्पद आढळले नाही, परंतु केवळ शवविच्छेदनानंतरच सर्व गोष्टींचा निकाल लागेल.” सध्या सोनालीचा मृतदेह बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेजमध्ये ठेवण्यात आला आहे. त्यांचे कुटुंबीय गोव्यात आल्यानंतर उद्या २४ ऑगस्टला शवविच्छेदन होईल. सोनाली या चित्रीकरणासाठी गोव्यामध्ये गेल्या होत्या.

हेही वाचा – दुरदर्शन अँकर, टिकटॉक स्टार ते राजकीय नेत्या; कोण होत्या सोनाली फोगट ज्यांच्यावर भाजपाने दिली होती मोठी जबाबदारी

दरम्यान, भारतीय जनता पक्षाने सोनाली फोगट यांची प्रसिद्धी पाहून हरियाणातील हिस्सार जिल्ह्यातील आदमपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर भाजपने हरियाणातील महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती केली होती. सोनाली यांचे पती संजय फोगट यांचेही २०१६ मध्ये निधन झाले होतं.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sonali phogats sister claims actress food was poisoned hrc

ताज्या बातम्या