बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा पती आनंद अहुजा यांच्या घरी बाळाचे आगमन झाले आहे. सोनम कपूरने शनिवारी २० ऑगस्ट २०२२ रोजी गोंडस मुलाला जन्म दिला. एक पोस्ट शेअर करत सोनम कपूरने चाहत्यांना ही गुडन्यूज दिली आहे. सोनम कपूरच्या या गुडन्यूजमुळे कपूर कुटुंबाच्या घरात मोठा आनंद पाहायला मिळत आहे. यानंतर आता सोनम कपूरच्या बाळाची पहिली झलक समोर आली आहे. सोनम कपूरची बहिण रिया कपूर हिने नुकतंच सोशल मीडियावर बाळाचा फोटो शेअर केला आहे.

सोनम कपूरची बहिण रिया कपूरने इन्स्टाग्रामवर नुकतंच एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने बाळाचे तीन फोटो पोस्ट केले आहेत. यात सोनमचे बाळ, रिया कपूर आणि तिची आई सुनिता कपूर पाहायला मिळत आहेत. यात बाळाचा चेहरा दिसू नये म्हणून तिने इमोजीचा वापर केला आहे. त्यामुळे सोनम कपूरच्या बाळाचा चेहरा पाहायला मिळत नाही.
“मला तो माझ्या भावाप्रमाणे वाटला होता पण…”; ‘अशी’ होती सोनम कपूर-आनंद आहुजाची पहिली भेट

The husband killed his wife and son due to suspicion of character
नागपूर ब्रेकिंग : चारित्र्यावरील संशयातून पतीने केला पत्नी व मुलाचा खून, नंतर स्वत:ही संपवले जीवन
kolhapur, Two Arrested in scam, India Makers Agro Scam, Rs 2 Crore Assets Seized, shridhar khedekar, suresh junnare, lure, crore scam, police, scam news, kolhapur news, marathi news,
कोट्यवधीचा गंडा; इंडिया मेकर्स ऍग्रो इंडियाशी संबंधित आणखी दोघांना कोल्हापुरात अटक
girl killed her mother with the help of friend
पुणे : धक्कादायक! मित्राच्या मदतीने मुलीने केला आईचा खून
Mumbai local Women Passengers Hardly Wears Clothes Like Shirt Suits
“मुंबई लोकलमध्ये किती बायका असे कपडे घालून चढतात, उगाच..”, ‘लंडन की लाली’ने उघडले डोळे, पाहा Video

या फोटोला कॅप्शन देताना ती म्हणाली, “रिया मावशी ही आज अजिबातच ठीक नाही. तू खूपच गोंडस आहेस आणि हा क्षण फारच काल्पनिक आहे. तुझी धाडसी आई सोनम कपूर, प्रेमळ बाबा आनंद अहुजा आणि आजी सुनिता कपूर यांच्याकडून खूप खूप प्रेम.”

“आम्हाला…” आजोबा झाल्यानंतर अनिल कपूर यांची पहिली प्रतिक्रिया

रिया कपूरची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. तसेच तिचे हे फोटोही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. विशेष म्हणजे तिच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंटही केल्या आहेत. दरम्यान सोनम कपूरने २०१८ मध्ये आनंद अहुजाशी लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर चार वर्षांनी तिने आई होणार असल्याची गुडन्यूज दिली होती. तिच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडला होता. त्याचे अनेक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.