…अशी सुरु झाली सोनम कपूर आणि आनंदची प्रेमकहाणी

आज सोनम कपूरच्या लग्नाचा तिसरा वाढदिवस आहे.

बॉलिवूडची ‘खुबसूरत गर्ल’ सोनम कपूर ही कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आज ८ मे रोजी सोनमच्या लग्नाचा तिसरा वाढदिवस आहे. तिने उद्योगपती आनंद अहूजाशी ८ मे २०१८मध्ये लग्न केले होते. सोनम पती आनंदसोबतचे फोटो बऱ्याच वेळा सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. पण सोनम आणि आनंदची पहिली भेट कुठे झाली? तसेच त्यांची लव्हस्टोरी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया सोनम आणि आनंदची लव्हस्टोरी

२०१४ मध्ये सोनम आणि आनंद पहिल्यांदाच एकमेकांना भेटले होते. सोनमची स्टायलिस्ट आणि जवळची मैत्रिण पर्निया कुरेशीने त्या दोघांची भेट घडवून आणली होती. पर्निया ही आनंदचीही खूप चांगली मैत्रीण.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonam K Ahuja (@sonamkapoor)

‘हिंदुस्तान टाइम्स’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार सोनमची भेट घेतल्यानंतर जवळपास महिन्याभरातच आनंदने तिला प्रपोज केलं होतं. तेव्हापासूनच त्यांच्या ओळखीला एक वेगळं वळण मिळालं. अक्षय कुमारने २०१६ मध्ये हॉलिवूड अभिनेता विल स्मिथ याच्यासाठी आयोजित केलेल्या पार्टीमध्ये आनंदला पहिल्यांदाच सर्वांनी पाहिलं. त्यावेळी त्याच्यावर माध्यमांच्याही नजरा खिळल्या होत्या. त्यानंतर बरेच कार्यक्रम आणि पार्ट्यांमध्ये सोनमसोबत आनंद दिसू लागला. सुट्टीच्या निमित्तानेसुद्धा ही जोडी एकमेकांसोबत काही खास क्षण व्यतीत करु लागली. पण कधीही त्यांनी नात्याची कबुली दिली नाही.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळा म्हणू नका किंवा अनिल कपूरचा वाढदिवस, प्रत्येक कार्यक्रमात, कौटुंबिक सोहळ्यात आनंदची हजेरी बरंच काही सांगून गेली होती. अखेर २०१८, मे महिन्याच्या सुरुवातीलाच आनंद आणि सोनम या दोघांच्याही कुटुंबियांतर्फे त्यांच्या लग्नाची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. ८ मे रोजी सोनम आणि आनंद एका नव्या प्रवासाला सुरुवात केली होती. आज त्यांच्या लग्नाला ३ वर्ष पूर्ण झाली आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sonam kapoor anand hujas love story avb

ताज्या बातम्या