बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सोनम कपूर फॅशन आयकॉन म्हणून ओळखली जाते. सोनम नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे कपडे परिधान करताना दिसते. सोनम सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. सोनमने नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सोनमचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सोनमने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले. या फोटोत सोनमने लाल रंगाचा मिडी ड्रेस परिधान केला आहे. सोनम या फोटोत सुंदर दिसत आहे. या फोटोत सोनमने Alexander McQueen या फॅशन हाऊसचा ड्रेस परिधान केला आहे. सोनमचा हा डीप व्ही बॅकलेस ड्रेस आहे. सोनमचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

आणखी वाचा : वयाच्या ४७ व्या वर्षी ऐश्वर्या होणार आई?

sonam kapoor, sonam kapoor instagram, anil kapoor,
सोनम कपूरच्या या पोस्टवर कमेंट करत अनिल कपूर यांनी ती सुंदर दिसत असल्याचे म्हटले आहे.

आणखी वाचा : मित्राच्या घरी ड्रेस बदलणे उर्फी जावेदला पडले होते महागात, घरमालकाने दिली होती धमकी

या फोटोवर कमेंट करत नेटकऱ्यांपासून सेलिब्रिटींनी सोनमची स्तुती केली आहे. सोनमचे वडील आणि अभिनेते अनिल कपूर कमेंट करत फोटो ‘सुंदर दिसत आहेस’ असे म्हटले आहे. सोनमच्या या ड्रेसची किंमत ही फॅशन हाऊस Alexander McQueen यांच्या अधिकृत वेब साइटवर २ लाख ७२ हजार २६ रुपयांच्या आसपास आहे.