सोनम कपूरने स्वीकारले ‘साडी चॅलेंज’, फोटो पाहाच

सोनम कपूर नेहमी तिच्या लूक्स आणि फॅशनेबल कपड्यांमुळे चर्चेत असते.

सोनम कपूर

बॉलिवूडमधील फॅशन आयकॉन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे सोनम कपूर. सोनम कपूर नेहमी तिच्या लूक्स आणि फॅशनेबल कपड्यांमुळे चर्चेत असते. सोनमचे अनेक चाहते तिला फॅशनच्याबाबती तिला फॉलो करताना दिसतात. सोनम तिचे अनेक फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकताच सोनमने तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो सध्या व्हायरल झाल्याचे दिसत आहे.

सोशल मीडियावर विविध चॅलेंज व्हायरल होत असतात. ‘बॉटल कॅप’ चॅलेंज नंतर सध्या सोशल मीडियावर ‘साडी चॅलेंज’ची क्रेझ आहे. सोनम कपूर कायमच फॅशन ट्रेंड फॉलो करते. इंस्टाग्राम आणि ट्विटरवर विविध विषयांवर ती बिनधास्त व्यक्त होते.

आताही साडी चॅलेंजने तिने सगळ्यांना आश्चर्यचकित केले आहे. या चॅलेंजमध्ये साडी नेसून आपला फोटो सोशल मीडियावर पोस्ट करायचा आहे. सोनमने हे चॅलेंज वेगळ्या पद्धतीने केले आहे. तिने तिच्या लहानपणीचा एक फोटो सुद्धा शेअर केला आहे. या फोटोतही तिने साडी नेसली आहे. लहानपणीच्या फोटोसोबतच तिने एक लग्नानंतरचाही एक फोटो शेअर केला आहे.

‘एक लड़की को देखा तो ऐसा लगा’ या चित्रपटानंतर सोनम ‘द झोया फॅक्टर’ या चित्रपटात झळकणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sonam kapoor saree challenge tweet djj