Koffee With Karan 7: “माझे सर्व भाऊ माझ्या मैत्रीणींबरोबर …. “, सोनम कपूरने केली कपूर भावंडांची पोलखोल

‘कॉफी विथ करण’मध्ये सोनम कपूर सतत अर्जुन कपूरची खिल्ली उडवताना दिसत आहे

Koffee With Karan 7: “माझे सर्व भाऊ माझ्या मैत्रीणींबरोबर …. “, सोनम कपूरने केली कपूर भावंडांची पोलखोल

‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये नेहमीच सेलिब्रिटी बॉलिवूडमधील गॉसिप किंवा खासगी आयुष्याबद्दल धक्कादायक खुलासे करत असतात. नुकतीच या शोमध्ये अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा चुलत भाऊ अभिनेता अर्जुन कपूरने हजेरी लावली होती. गरोदर असतानाही सोनमने या शोमध्ये हजेरी लावत धमाल केलीय. हा खास भाग रक्षाबंधनच्या दिवशी प्रसारित होणार आहे. या खास भागाचा प्रोमो करण जोहरने सोशल मीडियावर शेअऱ केला आहे. ज्यात अर्जुन आणि सोनमची धमाल पाहायला मिळतेय.

या रक्षाबंधन स्पेशल भागामध्ये सोनम आणि अर्जुन खासगी आयुष्याबद्दलही बोलताना दिसणार आहेत. मात्र या प्रोमोमध्ये सोनमने अर्जुन आणि तिच्या इतर भावांबद्दल एक धक्कादायक वक्तव्य केलंय. “तुझ्या एखाद्या मैत्रीणीसोबत अर्जुनने रात्र घालवली आहे का किंवा रिलेशनशिपमध्ये तो होता का?” असा सवाल करणने सोनमला विचारला यावर ती म्हणते “मला तर यावर चर्चाच करायची नाही. माझे सर्व भाऊ माझ्या मैत्रिणींसोबत झोपले आहेत. ” सोनमचं हे उत्तर ऐकून अर्जुन आणि करणला धक्काच बसला,

सोनमच्या उत्तरावर करणने तिच्या भावांवर प्रश्न उपस्थित केला. “तुझे कसे भाऊ आहेत यार” असं तो म्हणाला. तर “तू कशी बहिण आहेस. तू आमच्याबद्दल असं कसं म्हणू शकतेस” असं अर्जुन म्हणाला.

हे देखील वाचा: अर्जुन कपूरच्या फोनमध्ये ‘या’ नावाने सेव्ह आहे गर्लफ्रेंड मलायकाचा नंबर

हे देखील वाचा: “आम्ही लवकरच…” सुझान खानशी लग्न करण्याबद्दलच्या चर्चांवर अर्सलन गोणीचा मोठा खुलासा

तर दुसरीकडे सोनमला तिचा आणखी एक भाऊ म्हणजेच रणबीर कपूरबद्दलही एक प्रश्न विचारण्यात आल्याचं दिसतंय. करणने सोनमला मॅन ऑफ द मोमेंट कोण आहे, असा प्रश्न विचारला. यावर तिने लगेचच रणबीर कपूरचं नाव घेतलं. मात्र पुढे ती जे म्हणाली त्याने पुन्हा करण आणि अर्जुन चकित झाले. “रणबीरचा लवकरच सिनेमा येतोय जो अयान मुखर्जीने दिग्दर्शित केलाय. त्यामुळे तो सर्वत्र प्रमोशन करताना दिसतोय.” असं सोनम म्हणाली. यावर करणने तिला सिनेमाचं नाव विचारलं आणि सोनम म्हणाली, “शिवा नंबर १”सोनमला भावाच्या सिनेमाचं नावही माहित नाही हे पाहून दोघं थक्क झाल्याचं दिसतंय.

‘कॉफी विथ करण’मध्ये सोनम कपूर सतत अर्जुन कपूरची खिल्ली उडवताना दिसत आहे. यावर अर्जुन कपूर “सोनम कपूरकडून ट्रोल होण्यासाठी मला इथे बोलावले आहे का?” असंही म्हणताना दिसतो. दरम्यान या शोमध्ये आतापर्यंत, अक्षय कुमार, समांथा रुथ प्रभू, विजय देवरकोंडा, अनन्या पांडे, रणवीर सिंग, आलिया भट्ट, करीना कपूर खान आणि आमिर खान या सेलिब्रेटींनी हजेरी लावली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“मी तुम्हाला लहानपणी…” हेमांगी कवीने सांगितला ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांच्या पहिल्या भेटीचा ‘तो’ किस्सा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी