प्रसिद्ध गायक सोनू निगमने लाउडस्पीकरवरून होणाऱ्या अजानबद्दल ट्विट केले होते. यावरून नंतर बराच वाद सुरु झाला. काहींनी याविरुद्ध सोनूला खडेबोल सुनावले तर काहींनी त्याला पाठिंबा दिला. पश्चिम बंगालमधील मौलवी सय्यद शाह आतिफ अली अल कादरी यांनी तर सोनू निगमच्या  (Sonu nigam) विरोधात फतवाच काढला होता. सोनूचे मुंडन करून त्याच्या गळ्यात चपलांचा हार घालणाऱ्यांना त्यांनी दहा लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. मात्र, सोनूने पत्रकार परिषद बोलावून स्वतःच मुंडन करून घेतले. सोनूचे टक्कल करणाऱ्या न्हाव्याने तब्बल वीस हजार रुपये घेतले होते.

सोनू निगमचे मुंडन करणारा कोणी सामान्य न्हावी नव्हता. तर आलिम हाकिम या प्रसिद्ध बॉलिवूड हेअर स्टायलिस्टने सोनूचे टक्कल केले होते. अमिताभ बच्चन, दिलीप कुमार, हृतिक रोशन, रणबीर कपूर, वरुण धवन यांसारखे मोठे सेलिब्रिटी हाकिमचे क्लायंट आहेत. आलिम हाकिम एका हेअर कटसाठी तब्बल वीस हजार रुपये चार्ज करतो. आलिमच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, त्याचे वडील हाकिम कैरानवी हे भारतातील पहिले सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट होते. केवळ १६ वर्षांचा असल्यापासून आलिमने हेअर स्टायलिस्ट म्हणून काम करण्यास सुरुवात केली. मुंबईव्यतिरिक्त हैदराबाद, बंगळुरु, अहमदाबाद आणि दुबई येथे त्याचे सलॉन आहेत.

Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
Is eating poha better than idli for breakfast
Poha Or Idli : नाश्त्यात पोह्यापेक्षा इडली खाणे चांगले? मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणता नाश्ता चांगला? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
farmer protest marathi news, farmer protest for msp, minimum support price marathi news
टीकाकारांना हमीदर मागणाऱ्या शेतकऱ्यांइतकी समज कधी येणार?
What is tax harvesting and what to be careful about
Money Mantra: टॅक्स हार्वेस्टिंग काय असतं? ते करताना काय काळजी घ्यावी?

sonu-nigam-blad

दरम्यान, विरोधकांना प्रत्युत्तर देण्यासाठी सोनू निगमने मुंडन केल्यानंतर त्याला पाठिंबा देणाऱ्यांची संख्या आता वाढत असल्याचे दिसतेय. सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणाऱ्या, आपली मतं ठामपणे मांडणाऱ्या अभिनेता अनुपम खेर यांनी सोनूचे ‘दमदार बंदा’ या शब्दांत वर्णन करत त्याला पाठिंबा दिलायं. त्यांनी ट्विट केलंय की, ‘बंदे में है दम, जय हो सोनू निगम’. अभिनेता रणदीप हुड्डा, रणवीर शोरे आणि अभिनेत्री- निर्माती खुशबू यांनीही सोनूला पाठिंबा देणारे ट्विट केले आहेत. भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने तर हॉलिवूड कलाकार ड्वेन जॉन्सन आणि विन डिझेल यांचे फोटो ट्विट करत ‘सोनू निगम आम्हाला तुझा अभिमान आहे,’ असे लिहिलंय.