स्पाइस जेटकडून सोनूच्या कामाचं कौतुक; भावूक होत सोनू म्हणाला…

सोनूची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल.

(Photo credit – sonu sood twitter)

अभिनेता सोनू सूदने अभिनयाबरोबर समाज सेवेचाही विडाच उचलला आहे. लॉकडाउनच्या काळात सोनू सूदने वेगवेगळ्या शहरात अडकलेल्या अनेक स्थलांतरित मजुरांना घरी पोहोचवलं. तसंच इतर गरजूंच्या मदतीलाही तो सातत्याने धावून जाताना दिसत आहे. यामुळेच भारतातील अनेक लोकांनी त्याला खऱ्या आयुष्यातील हीरो म्हटले. त्याच्या या कामाची दखल स्पाइस जेट या विमान कंपनीने घेतली आहे. आता सोनू सूदच नाव फक्त लोकांच्या मनात नाही तर गगनात सुद्धा दिसणार आहे. त्यांचे आभार मानन्यासाठी सोनूने एक पोस्ट केली आहे.

सोनू सूदच्या या अतुलनीय योगदानाचा सन्मान करण्यासाठी स्पाइसजेटने एक विशेष प्रवासी विमान त्याला समर्पित केले आहे. स्पाइसजेटने अनावरण केलेल्या बोईंग ७३७ या विमानावर सोनूचा फोटो लावण्यात आला आहे. या फोटोसोबतच स्पाइस जेटने सोनूसाठी “देवदूत सोनू सूदला वंदन” अशा आशयाची ओळ त्यांनी लिहिली आहे. हा फोटो शेअर करताना सोनूही ट्विटरवर भावूक झाला आहे. त्याने स्पाइस जेटच्या त्या विमानाचे काही फोटो शेअर केले आहेत. “विना आरक्षित तिकीटावर पंजाबमधील मोगा ते मुंबई पर्यंत केलेला प्रवासाची आठवण झाली. आज मला माझ्या आई-वडीलांची खूप आठवण येत आहे.” अशा आशयाचे कॅप्शन त्याने फोटोंना शेअर करत दिले आहे.

सोनूच्या या ट्विटची चर्चा सर्वत्र सुरू आहे. अलीकडेचं सोनू सूदने बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याचं आश्वासन दिलं आहे. देशातील तब्बल १ लाख स्थलांतरितांना रोजगार मिळवून देणार असल्याचं त्याने म्हटलं आहे. सोनूच्या या आश्वासनानंतर तरुणांमध्ये नवीन आशा निर्माण झाली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sonu sood reacts to photo and name on the aeroplane going viral on social media dcp

ताज्या बातम्या