scorecardresearch

रस्त्यावर अपघात झालेल्या व्यक्तीला स्वत:च्या हाताने उचलून सोनू सूदने पोहोचवले रुग्णालयात, व्हिडीओ व्हायरल

हा अपघात पंजाबच्या मोगा जिल्ह्यात झाला असून सोनूने लगेच त्या व्यक्तीची मदत केली असून सोनूचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

sonu sood, sonu sood viral video,
हा अपघात पंजाबच्या मोगा जिल्ह्यात झाला असून सोनूने लगेच त्या व्यक्तीची मदत केली असून सोनूचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद हा एका देवदूतच आहे. गेल्या दोन वर्षांपासून तो सर्वसामान्य लोकांची मदत करतो. चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या सोनू सूदला आता प्रेक्षक रिअल लाइफ हीरो असं म्हणतात. नुकताच सोनू सूदचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी देखील तो एका गरजूची मदत करत असल्याचे दिसत आहे.

पंजाबच्या मोगा जिल्ह्यातील कोटकपूरा बायपास रस्त्याजवळ एक अपघात झाला. दोन वाहनांमध्ये झालेल्या अपघातात एक व्यक्ती जखमी झाला. ज्याला स्वत: सोनूने उचलले आणि रुग्णालयात घेऊन गेला. सोनूमुळे आता ती व्यक्ती सुखरुप आहे. या व्हिडीओत सोनूसोबत काही लोक दिसत आहेत. पण सोनूने त्यांच्याआधी त्या व्यक्तीला गाडीतून काढले आणि स्वत: च्या गाडी बसवून रुग्णालयात घेऊन गेल्याचे दिसत आहे.

आणखी वाचा : “तुझं मुळ विसरू नकोस”, झोमॅटोच्या जाहिरातीवरून अल्लू अर्जुन झाला ट्रोल

आणखी वाचा : “अपमानानंतरही अक्षय कुमार जर कपिल शर्मा शोमध्ये आला तर मी…”, अभिनेत्याचे ट्वीट चर्चेत

सोनूच्या या कामाची नेटकरी स्तुती करत आहेत. सोनू हा बॉलिवूडमधला असा अभिनेता आहे ज्याच्याकडे सर्वसामान्य जनता ही त्यांच्या समस्या सांगते. सोनू हा करोना काळ सुरु झाल्यापासून गरजुंच्या मदतीसाठी धावून आला आहे. त्याच्याकडून होईल तेवढी मदत करण्याचा तो प्रयत्न करतो.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-02-2022 at 13:46 IST

संबंधित बातम्या