सोनू सूदची बहिण लढवणार पंजाब विधानसभा निवडणूक, पत्रकार परिषदेत घोषणा

नुकतंच पत्रकार परिषद घेत त्याने याबाबतची माहिती दिली आहे.

पंजाबमध्ये आगामी वर्षात विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजणार आहे. करोना काळात अभिनेता सोनू सूद सध्या गरिबांसाठी ‘मसिहॉं’ बनला आहे. एकीकडे देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लोक मदतीसाठी सैरावैरा भटकत होते, तर दुसरीकडे अशा लोकांसाठी अभिनेता सोनू सूद अगदी देवदूतासारखा लोकांच्या मदतीसाठी धावून येत आहे. यानंतर काही राजकीय पक्षांकडून सोनू सूदला निवडणूक लढवण्याची ऑफर देण्यात आली होती. मात्र आता सोनू सूदने ही ऑफर नाकारली आहे. नुकतंच पत्रकार परिषद घेत त्याने याबाबतची माहिती दिली आहे.

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याने पंजाब विधानसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. मात्र आता त्याची बहीण मालविका सूद सच्चर या पंजाब निवडणूक लढवणार आहे. मात्र मालविका कोणत्या पक्षातून, कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार हे अद्याप समोर आलेले नाही. सोनूने नुकतंच एक पत्रकार परिषद घेत याबाबतची घोषणा केली आहे. मालविकाने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर सट्टेबाजीला सुरुवात झाली आहे.

काही दिवसांपूर्वी मालविका आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचा एकत्र एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये मालविकासोबत सोनू सूदही उपस्थित होता. तर दुसरीकडे कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन ‘पंजाब लोक काँग्रेस’या नव्या पक्षाची स्थापना केली होती. त्यामुळे आता मालविका ही त्यांच्या पक्षातून निवडणूक लढणार का? यासारख्या चर्चा उपस्थित होत आहेत.

दरम्यान मालविकाने करोना काळात सोनू सूदसोबत लोकांची मदत केली होती. यंदा जूनमध्ये त्यांनी राजकारणात येण्याचे संकेत दिले होते. मला राजकारणात यायला हरकत नाही, पण आता मला जनसेवेचा विस्तार करायचा आहे, असे मालविका म्हणाली होती. मी अजूनही सोनू सूदसोबत पीडितांना मदत करत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sonu sood sister malvika to contest punjab elections may declare party name later nrp

Next Story
चित्ररंग : फक्त जिस्मदर्शन
ताज्या बातम्या