“सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवोनिया म्हणत सर्वत्र आषाढी एकादशीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सलग दोन वर्षांनंतर यंदा सर्वत्र आषाढी एकादशी सार्वजनिकरीत्या मंदिरांमध्ये साजरी केली गेली. या निमित्ताने पंढरपुरातील विठ्ठल मंदिरासह सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. आषाढी एकादशीच्या निमित्ताने नुकतंच अभिनेता वरुण भागवत याने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने पांडुरंगाचे आणि गुगल मॅपचे अनोखे कनेक्शन अधोरेखित केले आहे.

वरुण भागवत हा इन्स्टाग्रामवर चांगलाच अॅक्टिव्ह असतो. वरुण हा सोनी मराठी वाहिनीवरील ‘ज्ञानेश्वर माउली’ या मालिकेत संत ज्ञानेश्वरांची भूमिका साकारत आहे. काल आषाढी एकादशीच्या निमित्ताने त्याने एक खास पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने विठ्ठलाच्या कपाळी असणाऱ्या टिळ्याचे आणि रस्ता दाखवणऱ्या गुगल मॅप्सचं आगळंवेगळं नातं सांगितलं आहे.

Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
baramati couple found dead marathi news
बारामतीत सदनिकेत दाम्पत्य मृतावस्थेत, दाम्पत्याच्या शरीरावर तीक्ष्ण शस्त्राचे वार
Rohit Sharma Akash Ambani spotted together in a car video viral
IPL 2024: रोहित शर्मा आणि आकाश अंबानी एकाच कारमधून प्रवास करत असल्याचा व्हीडिओ व्हायरल, नव्या चर्चांना उधाण
juna furniture teaser released by salim khan
ज्येष्ठ नागरिकांचा सहानुभूतीने विचार करायला हवा

अंकित मोहनच्या चिमुकल्या लेकाचा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, व्हिडीओ व्हायरल

वरुण भागवत याची इन्स्टाग्राम पोस्ट

“पांडुरंग आणि Google maps.

कधी पाहिलंय का की पांडुरंगाचा टिळा आणि Google maps च्या app चा symbol हा जवळजवळ सारखा आहे. मी निरीक्षण करत बसलो आणि लक्षात आलं की बरोबर. दोघेही final destination सांगतात. Google map आपल्याला इप्सित स्थळी पोहोचवतो आणि पांडुरंगाचा तो टिळा (नाम) हे दर्शवतो की इथे पोहोचायचय.

Google map रस्ता दाखवतो. पांडुरंग मात्र म्हणतो की रस्ता तुम्ही शोधा. तिथपर्यंत पोहोचण्याचं गमक तो सांगतो. प्रत्येकाचे रस्ते भिन्न असतील. प्रत्येकाच्या रस्त्यात मधे मधे सतत stops लागतील. त्या stops चं नाव असेल कर्म. एका कर्माची रेषा हिरवी तर दुसऱ्याची लाल असेल. हिरवा रंग म्हणजे चांगलं कर्म. लाल म्हणजे कुकर्म. हिरवं कर्म निवडायचं यासाठीची बुध्दी पांडुरंग आपल्याला देतो, ती वापरायचं काम आपलं. नाहीतर लाल रंगाच्या कर्माच्या traffic jam मधे आपण फसतो आणि काही केल्या त्यातून बाहेर पडता येत नाही. Choice आपल्या हातात दिलाय. योग्य निवड करत जात राहायचं.

रस्ता कधी कच्चा असतो, कधी पक्का. कधी चढ तर कधी उतार. कधी खड्डे तर कधी एकदम सुबक रस्ता. कधी सरळ तर कधी वळणावळणाचा रस्ता. कधी first gear तर कधी मस्त fifth gear वर जाता येईल. कधी आपण रस्त्याचा हात पकडू, कधी तो आपला हात पकडेल, अर्थात कधी आयुष्य आपल्याला नेत राहील, कधी आपण आयुष्याला सांगू, चल आज या दिशेने जाऊ. ज्याप्रमाणे रस्त्यात कधी गाडी बदलावी लागते त्याप्रमाणे आयुष्यात वेगवेगळे निर्णय घ्यावे लागतात.

कधी पायी चालावं लागतं त्याप्रमाणे जीवनात खडतर मार्ग अवलंबावा लागतो. या जगात आपण सारेच मुसाफिर. भटकत असतो. रस्ता असतो. चालत राहतो. हवेसंग डोलत असतो. प्रवास आहे. आनंद घेत असतो. आनंद घेत नाही आहोत असं जाणवत असेल तर क्षणभर थांबून एकदा विचार करायचा आणि स्वतःला विचारायचं की प्रवासात मजा येते आहे ना?

कारण नीट विचार केला की कळतं की इथे destination महत्त्वाचं आहे पण प्रवास जास्त महत्त्वाचा आहे. प्रवास उत्तम करायचा आहे. ऊन, सावली, पाऊस, वारा सगळं लागणार आहेच. पण आयुष्याची वारी अथक पूर्ण करायची. तिही शक्य तिथे, शक्य तेव्हा, शक्य तेवढा, शक्य तेवढ्या साऱ्यांना आनंद देत.

कारण माउलींनी म्हटलंच आहे, अवघाचि संसार सुखाचा करीन | आनंदें भरीन तिन्ही लोक || जाईन गे माये तया पंढरपुरा | भेटेन माहेरा आपुलिया ||

Destination तर set आहे. प्रवास उत्तम आणि आनंदी करणं आपल्याच हाती, असे वरुण भागवत याने म्हटले आहे.

‘जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल…’, ‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम परीचा आषाढी एकादशीनिमित्त हटके व्हिडीओ

दरम्यान सोनी मराठी वाहिनीवरील ‘ज्ञानेश्वर माऊली’ या मालिकेने प्रेक्षकांना भक्तिरसात तल्लीन केले आहे. संतांची परंपरा उलगडणारी ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेतील संत ज्ञानेश्वर माऊली यांची भूमिका साकारणारा अभिनेता वरुण भागवत याने पंढरपूर येथे जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेतले. ज्ञानेश्वर माऊली यांच्या पोशाखात वरुण वारीत सहभागी झाला.