scorecardresearch

‘गाथा नवनाथांची’ मालिकेत सुरभी हांडे दिसणार वेगळ्या भूमिकेत

२१ जून पासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

‘गाथा नवनाथांची’ मालिकेत सुरभी हांडे दिसणार वेगळ्या भूमिकेत
मोठ्या विश्रांतीनंतर या भूमिकेच्या माध्यमातून ती टेलिव्हिजनवर पुनरागमन करते आहे.

सोनी मराठी वाहिनी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच नवनाथांवर ‘गाथा नवनाथांची’ ही मालिका घेऊन आली आहे आणि ती प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरत असल्याचे दिसत आहे. कलियुगात जेव्हा मनुष्यावर असुरी शक्ती वरचढ होऊ लागली, तेव्हा नवनारायणांनी मनुष्यकल्याणासाठी नवनाथांच्या रूपात अवतार घेतला.

आत्तापर्यंत गोष्टींच्या स्वरूपात वाचलेल्या किंवा ऐकलेल्या कथा ‘गाथा नवनाथांची’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्या कथांपैकी आता येत्या काही भागांत सर्वश्रुत असलेली मच्छिन्द्रनाथ आणि देवी सप्तशृंगी यांची भेट पाहायला मिळणार आहे. नाथपंथामध्ये सप्तशृंगी देवीला विशेष स्थान आहे. सप्तशृंगी देवीच्या आशीर्वादाने मच्छिन्द्रनाथांच्या आयुष्याचा नवीन अध्याय सुरू होत असल्याची ही महत्त्वाची घटना आता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

मालिकेत सप्तशृंगी देवीची भूमिका सुरभी हांडे ही प्रसिद्ध अभिनेत्री साकारणार आहे. सुरभीने याआधीही पौराणिक आणि सामाजिक विषय असलेल्या मालिकांमध्ये काम करून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. मोठ्या विश्रांतीनंतर या भूमिकेच्या माध्यमातून ती टेलिव्हिजनवर पुनरागमन करते आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या