KBC 13: “माझ्या पोटावर पाय दिला”, कतरिनाच्या डायलॉगवर बिग बी म्हणाले…

सध्या अक्षय कुमार आणि कतरिना कैफ सुर्यवंशी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये

kbc-13- katrina-kaif-amitabh-bachchan

‘कौन बनेगा करोडपती १३’च्या यंदाच्या शानदार शुक्रवारच्या भागात ‘सुर्यवंशी’ सिनेमाची टीम हजेरी लावणार आहे. या खास भागाचा प्रोमो नुकताच रिलीज करण्यात आलाय. यात अभिनेत्री कतरिना कैफ आणि अक्षय कुमार हॉटसीटवर बसून गेम खेळतावा दिसतील. तसंच दिग्दर्शक रोहित शेट्टीने देखील या एपिसोडमध्ये हजेरी लावली आहे. यावेळी संपूर्ण टीमने बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत चांगलीच धमाल केल्याचं पाहायला मिळतंय.

दरम्यान, चॅनेलने शेअर केलेल्या या प्रोमोत कतरिना कैफ आणि बिग बी ‘अग्निपथ’ सिनेमातील डायलॉग बोलताना दिसत आहे. यावेळी कतरिनाने दमदार अंदाजात सिनेमातील विजय दिनानाथ चौहानचे डायलॉग म्हंटले आहेत. तर बिग बींनी देखील तिला यात साथ दिलीय. मात्र कतरिनाचा हा अंदाज पाहून बिग बी थक्क झाले आणि म्हणाले, “क्या बात है मॅडम…माझ्या पोटावर पाय दिला”. यानंतर अक्षय आणि रोहितला हसू फुटलं.

सलमान खाननंतर त्याच्या कोट्यावधी मालमत्तेचे काय होणार? स्वत:च मुलाखतीदरम्यान केला होता खुलासा


‘कौन बनेगा करोडपती १३’च्या शानदार शुक्रवारमध्ये यापूर्वी राजकुमार राव-क्रिती सेनॉन, पंकज त्रिपाठी-प्रतिक गांधी आणि सुनील शेट्टी-जॅकी श्रॉफ तसचं दीपिका पदुकोण-फराह खान यांनी हजेरी लावली होती.

सध्या अक्षय कुमार आणि कतरिना कैफ सुर्यवंशी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. या सिनेमात अक्षय दहशतवादविरोधी पथकातील पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. तर कतरिना एका डॉक्टरच्या भूमिकेत झळकणार आहे. पाच नोव्हेंबरला ‘सुर्यवंशी’ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sooryavanshi team in kbc 13 katrina kaif akshay kumar and rohit shettey fun with big b amitabh bachchan kpw

Next Story
चित्ररंग : फक्त जिस्मदर्शन
ताज्या बातम्या