मल्याळम् अभिनेते हरीश पेंगन यांचे निधन झाले. वयाच्या ४९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून हरीश यकृताच्या आजाराने त्रस्त होते. कोची येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. हरीश यांच्या निधनाने साऊथ चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.




हरीश यांनी ‘महेशिंते प्राधिकरण’ आणि ‘मीनल मुरली’सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं होतं. पोटात दुखत असल्यामुळे हरीश यांना कोची येथील अमृता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर हरीश यांना यकृतचा गंभीर आजार झाल्याचे समोर आले होते. डॉक्टरांनी तत्काळ यकृत प्रत्यारोपणाचा सल्ला दिला होता. हरीश यांची जुळी बहीण श्रीजा आपले यकृत देण्यास तयार होती. मात्र, उपचारासाठी मोठ्या रकमेची गरज होती.
हेही वाचा-
हरीश यांच्या मित्रांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत हरीश यांच्या उपचारासाठी मदत मागितली होती. मात्र, यकृत प्रत्यारोपणापूर्वीच त्यांचे निधन झाले. हरीश यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीयांसह चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.