scorecardresearch

“तुझी जादू पाहण्यासाठी…” ‘आदिपुरुष’चा दिग्दर्शक ओम राऊतसाठी प्रभासची खास पोस्ट

प्रभास पहिल्यांदाच दिग्दर्शक ओम राऊत बरोबर काम करत आहे

“तुझी जादू पाहण्यासाठी…” ‘आदिपुरुष’चा दिग्दर्शक ओम राऊतसाठी प्रभासची खास पोस्ट
फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस

तेलुगू सुपरस्टार प्रभास हा चांगलाच चर्चेत असतो. ‘बाहूबली’च्या यशानंतर तो जणू तरुणांच्या गळ्यातील ताईतच बनला आहे. त्याच्या प्रत्येक चित्रपटाकडे लोक खूप आतुरतेने पाहू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी ‘आदिपुरुष’ चित्रपटातील टीजरमुळे तो पुन्हा चर्चेत आला. या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला त्याने शुभेच्छा दिल्या आहेत त्यामुळे तो चर्चेत आला आहे.

लोकमान्य, तान्हाजी आणि आता ‘आदिपुरुष’ या चित्रपटांचा दिग्दर्शक ओम राऊत याच्या वाढदिवसानिमित्त प्रभासने पोस्ट शेअर केली आहे. प्रभासने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ओम राऊतचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहले आहे, “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिय ओम राऊत, तुझा दिवस छान जावो तुझी जादू पाहण्यासाठी आता जग वाट बघू शकत नाही,” अशा शब्दात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

विश्लेषण : रामदेव बाबांच्या ‘पतंजली’ला नेपाळमध्ये नो एंट्री; थेट काळ्या यादीत केला समावेश! नेमकं घडलंय काय?

चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांचा अपेक्षाभंग झाला आणि त्यांनी या चित्रपटाला विरोध करायला सुरुवात केली. या चित्रपटाला खूप ट्रोल केलं गेलं आहे. तसेच चित्रपटातील व्हीएफएक्स संदर्भातदेखील निर्मात्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. या चित्रपटाचे प्रदर्शनदेखील लांबवले आहे.

‘आदिपुरुष’ चित्रपट रामायणावर आधारित आहे. चित्रपटामध्ये प्रभू श्रीराम यांचे पात्र प्रभास साकारणार आहे. त्याच्याव्यतिरिक्त सैफ अली खान, क्रिती सेनॉन, सनी सिंह हे कलाकार दिसणार आहे. ‘जय मल्हार’ फेम अभिनेता देवदत्त नागे या चित्रपटामध्ये भगवान हनुमान यांच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. आता हा चित्रपट १६ जुन २०२३ रोजी प्रदर्शित होईल.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-12-2022 at 17:56 IST

संबंधित बातम्या