scorecardresearch

गरोदर असतानाचा हृदयविकाराच्या झटक्याने पतीचं निधन, सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं जगणंही झालं होतं कठीण, म्हणाली, “विधवा स्त्रिया…”

सुप्रसिद्ध अभिनेत्रीने पतीचं अचानक निधन झाल्यानंतर तिला कोणत्या समस्यांना सामोर जावं लागलं याबाबत भाष्य केलं आहे.

गरोदर असतानाचा हृदयविकाराच्या झटक्याने पतीचं निधन, सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं जगणंही झालं होतं कठीण, म्हणाली, “विधवा स्त्रिया…”
सुप्रसिद्ध अभिनेत्रीने पतीचं अचानक निधन झाल्यानंतर तिला कोणत्या समस्यांना सामोर जावं लागलं याबाबत भाष्य केलं आहे.

कन्नड चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेता चिरंजीवी सरजाचे ७ जून २०२० रोजी निधन झालं. हृदय विकाराच्या झटक्याने वयाच्या ३९व्या वर्षी चिरंजीवीची प्राणज्योत माळवली. पण यादरम्यान चिरंजीवीची पत्नी मेघना राज गरोदर होती. गरोदर असतानाचं पतीचं निधन होणं हे मेघनासाठी खूपच धक्कादायक होतं. आता या सगळ्या परिस्थितीबाबत मेघनाने भाष्य केलं आहे.

आणखी वाचा – Video : “तुझ्यात दम आहे तर…” राखी सावंत व अपूर्वा नेमळेकरमध्ये मारामारी, घरातील भांडी फोडतानाचाही व्हिडीओ व्हायरल

‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, मेघना म्हणाली, “बरेच लोक माझ्याजवळ येऊन वेगवेगळ्या गोष्टी बोलायचे. मी माझं दुःख सगळ्यांसमोर मांडावं असं त्यांना वाटायचं. जशा विधवा स्त्रिया वागतात तसं मीही वागावं असं लोकांचं म्हणणं होतं. लोकांना असं वाटायचं की ते जे विचार करत आहेत ते बरोबर आहे. पण माझा दृष्टीकोन काही वेगळाच होता.”

“चिरंजीवीच्या जाण्याने इतर कोणाला फारसा फरक पडला नसावा असं कित्येक लोक मला येऊन बोलायचे. लोकांना यासगळ्या गोष्टी कशा माहित असतात. प्रत्येकाची व्यक्त होण्याची पद्धत ही वेगळी असते. मला बऱ्याचदा हसण्याची इच्छा असायची. पण मी हसू शकत नव्हते. कारण मी हसले तर लोक काय विचार करतील? हा प्रश्न मला पडायचा.”

आणखी वाचा – छोट्या पडद्यावरील ‘गोपी बहू’ने गुपचूप उरकलं लग्न, नवऱ्याचं नाव व चेहरा दाखवण्यास दिला नकार, म्हणाली…

पुढे मेघना म्हणाली, “तिला सहानुभूती दाखवू नका. तिच्याकडे सगळं काही आहे. असंही म्हणणारे लोक मी पाहिले आहेत. माझ्याकडे सगळं काही आहे. मी एका चांगल्या कुटुंबामधील मुलगी आहे. मी चांगली जीवनशैली जगते. पण याचा अर्थ असा नाही की मी व्यक्ती नाही, माझं नातं खोटं आहे, मला त्रास होत नाही. लोक असं कसं बोलू शकतात?” मेघनाने तिच्या कठीण प्रसंगांमध्ये आलेल्या अनुभवांबाबत भाष्य केलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-12-2022 at 18:49 IST

संबंधित बातम्या