दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी नो- मेकअप लुकमुळे, भन्नाट डान्स आणि अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असते. पण सध्या ती एका फोटोमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. या फोटोमुळे तिनं लग्न केल्याच्या अफवा पसरल्या आहेत. पण आता या अफवांवर साईनं मौन सोडलं आहे. तिनं ट्वीट करून नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा – परिणीती-राघव यांच्या लग्नाला प्रियांका चोप्रा लेकीसह होणार हजर; पण निक जोनस राहणार गैरहजर कारण….

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हेही वाचा – तीन महिन्यांनंतर दीपिका कक्कर-शोएब इब्राहिमच्या मुलाची पहिली झलक; पाहा व्हिडीओ

साई ट्वीट करत म्हणाली की, “खरंतर, मला अफवांची पर्वा नाही. पण जर एखादा मित्र जो कुटुंबातील सदस्याप्रमाणे आहे, तो या अफवांचा भाग असेल तर मला बोललं पाहिजे. माझ्या चित्रपटाच्या पूजेच्या कार्यक्रमातील एक फोटो जाणूनबुजून क्रॉप करून वाईट हेतूने इकडे तिकडे पसरवला गेला आहे. जेव्हा मला माझ्या कामावर चालू असलेल्या चांगल्या गोष्टींबद्दलची माहिती तुम्हा सगळ्यांना द्यावीशी वाटते आणि तेव्हा हे खूप वाईट वाटण्यासारखं आहे की, मला या रिकामटेकड्या कारनाम्यांची स्पष्टीकरणं द्यावी लागतायत. अशाप्रकारे त्रास देणे खूप वाईट आहे.”

हेही वाचा – Video: परिणीती चोप्रा-राघव चड्ढा कुटुंबियांसह पोहोचले उदयपूरला, विमानतळावर झालं खास स्वागत

हेही वाचा – ‘जवान’नंतर दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा बॉलीवूडमध्ये करणार नाही काम; दिग्दर्शक अ‍ॅटलीवर आहे नाराज

दरम्यान, साईचा जो फोटो व्हायरल झाला होता, तो तिच्या आगामी ‘एसके २१’ चित्रपटाचा फोटो होतो. हा चित्रपट राजकुमार पेरियासामी दिग्दर्शित करत आहेत. याच चित्रपटाच्या पूजेच्या कार्यक्रमातील तो व्हायरल फोटो होता. जो काही लोकांनी क्रॉप करून सोशल मीडियावर व्हायरल केला होता. पण आता या अफवांवर साईनं नाराजी व्यक्त केली आहे. साई पल्लवी ‘एसके २१’ व्यतिरिक्त ‘एनसी २३’ या चित्रपटातही झळकणार आहे. या चित्रपटात ती नागा चैतन्यबरोबर पाहायला मिळणार आहे.

Story img Loader