बॉलिवूड अभिनेते अभिनेत्रींचे फोटो सोशल मीडियावर कायमच व्हायरल होत असतात. मग ते चित्रपटाचे प्रमोशन असो किंवा एखाद्या पार्टीतले फोटो असो, त्यांच्या फोटोंवर नेटकरी कायमच कमेंट करत असतात. कलाकार आपले नवीन फोटो शेअर करतातच मात्र आपल्या बालपणीचे, तरुणपणीचे फोटो शेअर करत असतात. नुकताच एका दाक्षिणात्य अभिनेत्रीचा फोटो व्हायरल होत आहे

‘पुष्पा’ चित्रपटातील आयटम सॉंग असो किंवा ‘फॅमिली मॅन’, ‘यशोदा’सारखा थ्रिलर चित्रपट अभिनेत्री समांथा रुथ प्रभू  कायमच प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. समांथा सोशल मीडियावरदेखील सक्रीय असते. सध्या तिचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राहुल रवींद्रन या अभिनेत्याने आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून तिचा १३ वर्षांपूर्वीचा फोटो शेअर केला आहे. ज्यात तो असं म्हणतो “या फोटोकडे बघ मला काय सापडले आहे, १४वर्षांपूर्वी काढलेला हा फोटो आहे. सॅमी १३ वर्ष पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन.” अभिनेत्याच्या या ट्वीटवर सामंथाने “धन्यवाद” असा रिप्लाय दिला आहे.

aai kuthe kay karte fame milind gawali did film with gracy singh
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्याने ‘लगान’मधील अभिनेत्रीसह केलंय काम! चित्रपट प्रदर्शित झालाच नाही, शेअर केला व्हिडीओ
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर

आधी मुलांनी मग आई-वडिलांनी जोडले हात; देशमुख कुटुंबाचा व्हिडीओ व्हायरल, जिनिलीया म्हणाली…

समांथाचा जन्म चेन्नईमध्ये झाला असून तिने कॉमर्स शाखेतून पदवी संपादन केली आहे. तिने कॉलेजात शिकत असताना मॉडेलिंग करण्यास सुरवात केली होती. तिने २०१० साली गौतम मेनन यांच्या ‘या माया चेसवे’ या तेलगू चित्रपटातून पदार्पण केले. त्यानंतर तिने ‘रंगस्थलम’, ‘माजिली’, ‘ख़ुशी’, ‘थेरी’, ‘एगा’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. लवकरच तिचा ‘शाकुंतलम’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

अभिनेता नागा चैतन्यशी तिने लग्नगाठ बांधली होती. मात्र लग्नानंतर अवघ्या ४ वर्षातच ते वेगळे झाले आहेत. त्यांच्या घटस्फोटाची बातमी ऐकून चाहत्यांना धक्का बसला होता. दोघांनी एकत्र कामही केले आहे.