scorecardresearch

‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी राजामौली यांनी घेतले १० कोटी?, जाणून घ्या सत्य

‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या प्रमोशन कार्यक्रमादरम्यान दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक एस.एस.राजामौली हेदेखील दिसले होते. यासाठी त्यांनी १० कोटी घेतले असल्याची चर्चा रंगली होती.

rajamouli charged 10 crores to promote brahmastra know the truth

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य भूमिकेत असलेला ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट ९ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. अयान मुखर्जी दिग्दर्शित या बिग बजेट चित्रपटाची चाहत्यांनाही उत्सुकता होती. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशनही करण्यात आले होते.

‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या प्रमोशनाच्या कार्यक्रमादरम्यान दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक एस.एस.राजामौली हेदेखील दिसले होते. त्यांनी चित्रपटाचं कौतुकही केलं होतं. यामुळे समाजमाध्यमांमध्ये चर्चांना उधाण आलं. राजामौली यांनी ‘ब्रह्मास्त्र’चे प्रमोशन करण्यासाठी १० कोटी घेतले असल्याची चर्चा रंगली होती. याबाबत आता खरी माहिती समोर आली आहे. बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरच्या ‘धर्मा’ या निर्माती कंपनीच्या सूत्रांनी याबद्दल माहिती दिली आहे.

हेही वाचा >> Video : अनन्या पांडेने गायलं ‘ये काली काली…’ गाणं, आयुष्मान खुराणाचा भन्नाट डान्स पाहून नेटकरी म्हणाले…

‘धर्मा’ निर्माती कंपनीच्या सूत्रांनी बॉलिवूड हंगामाने दिलेल्या माहितीनुसार, राजामौली यांनी स्वत:हूनच ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचे प्रमोशन केले आहे. ते म्हणाले “धर्मा प्रोडक्शनने हिंदीतील बाहुबली चित्रपटाचे वितरण केले होते. तेव्हापासूनच करण जोहर आणि एस.एस.राजामौली यांचे संबंध चांगले आहेत. त्यांनी स्वत:हूनच या चित्रपटाचे सद्भावनेने प्रमोशन केले आहे. त्यामुळे पैसे घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. करण जोहर आणि राजामौली यांच्यातील संबंध बिघडवण्यासाठी हे केलं जात आहे”.

हेही वाचा >> कपूर कुटुंबियांकडून आलियाच्या डोहाळे जेवणाची जय्यत तयारी, ‘हे’ कलाकार होणार सहभागी

बॉलिवूडमधील इतर चित्रपटांप्रमाणे ‘ब्रह्मास्त्र’लादेखील ट्रेलरपासूनच बॉयकॉट ट्रेण्डचा सामना करावा लागला होता. तरीही या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जादू कायम आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाने १६१ कोटींची कमाई केली आहे. चित्रपटात आलिया-रणबीरसह बिग बी अमिताभ बच्चन, मौनी रॉय, दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-09-2022 at 12:17 IST